pratap sarnaik  Saam tv
मुंबई/पुणे

Mira Bhayandar protest : मिरा-भाईंदरमध्ये शिंदेंच्या मंत्र्याविरोधात जनआक्रोश; आंदोलकांनी प्रताप सरनाईकांना मोर्चातून हुसकावलं, VIDEO

Mira Bhayandar protest News : मीरा रोडच्या मोर्चातून मंत्री प्रताप सरनाईकांना हाकलून लावलं... नेमकं मोर्चात काय घडलं? मराठी नागरिकांनीच सरनाईकांना हा हुसकावून लावलं? पाहूयात....

Suprim Maskar

सत्ताधारी पक्षातील मंत्री प्रताप सरनाईक यांच्याविरोधात... मीरारोडच्या मराठी मोर्चात सहभागी होण्यासाठी गेलेल्या सरनाईकांना आंदोलकांनी हुसकावलं.... मोर्चातील लोकांकडून 'सरनाईक गो बॅक', जय गुजरातच्या घोषणा देण्यात आल्या. मराठी माणसाच्या आक्रमकपणामुळे अखेर प्रताप सरनाईकांनी मराठी मोर्चातून काढता पाय घेतला..किंबहुना मराठी माणसांनीच त्यांना हुसकावून लावल्याची टीका विरोधकांनी केलीय..

स्थानिक आमदाराविरोधात हा राग उफाळून येण्यासाठी कारण ठरलं ते प्रताप सरनाईकानी काही दिवसांपूर्वीचं केलेलं विधान.

सरनाईकांचं हे विधान परप्रांतीयांना हिंदीचा माज महाराष्ट्रात दाखवण्यासाठी कारणीभूत ठरलं आणि मीरारोडमध्ये परप्रांतीय व्यापाऱ्यांनी थेट मराठीविरोधात मोर्चा काढला... त्यानंतर परप्रांतीय व्यापाऱ्यांच्या मुजोरीला मराठी माणसांनी मीरारोडमध्ये मोर्चानं चोख उत्तर दिलं.

मात्र सरनाईकांचं मोर्चात सहभागी होणं मराठी आंदोलकांना खटकलं..ठाकरे सेनेचे नेते राजन विचारे यांनी सरनाईकांच्या दुट्टपी भूमिकेवर निशाणा साधलाय..

गेल्या काही दिवसांपासून वारंवार मराठी माणसाच्या अस्मितेला ललकारलं जातयं. त्यात मीरारोडमधील मोर्चानं थेट सत्ताधारी पक्षातील मंत्र्यांचीच कोंडी झालीय. अशात मराठी माणसाचा हा एल्गार परप्रांतीयांची आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या नेत्यांची मुजोरी थांबवणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: लहानपणी आईवडिलांचे छत्र हरपलं; आजीने भाजी विकून मोठं केलं, UPSC क्रॅक करत कॉन्स्टेबल उदय कृष्णा रेड्डी झाले IPS अधिकारी

Todays Horoscope: 'या' राशींसोबत आज मनोबल वाढवणाऱ्या घटना घडतील; वाचा राशीभविष्य

Ind vs Aus: विजयी चौकार मारून जेमिमाला अश्रू अनावर; भर मैदानात कर्णधार हरमनप्रीतलाही कोसळलं रडू, पाहा Video

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांना कधी मिळणार कर्जमाफी? मुख्यमंत्र्यांनी सांगितली तारीख

Ind vs Aus Semifinal: शाब्बास पोरींनो! भारताच्या लेकींनी मैदान गाजवलं, ऑस्ट्रेलियाला नमवत फायनलमध्ये दणक्यात एन्ट्री

SCROLL FOR NEXT