मीरा-भाईंदरमध्ये अमराठी महापौर झाल्याने मराठी एकीकरण समिती आक्रमक झालीय... 40 मराठी नगरसेवक असूनही गुजराती महापौर झाल्याने संताप व्यक्त होतोय. दरम्यान आता मीरा भाईंदरच्या महापौर पदावरुन राडे होताना दिसत आहे.
मीरा-भाईंदर महापालिकेवर गुजराती महापौर, वाद आणखी चिघळणार?
मीरा-भाईंदर महापालिकेवर गुजराती महापौर बसवण्यावरून मराठी एकीकरण समिती आक्रमक झाली... मीरा भाईंदरमध्ये मराठीच महापौर हवा या मागणीसाठी मराठा एकीकरण समितीनं रस्त्यावर आंदोलन केलं.... 40 मराठी नगरसेवक असूनही अमराठी महापौर महापालिकेवर का बसवला? असा सवालच समितीने उपस्थित केला....
मराठी महापौरासाठी रस्त्यावर आंदोलन सुरु असताना मीरा भाईंदर महापालिकेत सुरू असलेल्या निवडणूकीत भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या वहिनी डिंपल मेहता या 79 मताने महापौर म्हणून निवडून आल्या... त्यामुळे आता मराठी माणूस काय करू शकतो हे दाखवून देऊ असा इशारा एकीकरण समितीने दिलाय.
प्रताप सरनाईक काय म्हणाले?
दरम्यान अमराठी महापौरावरून वाद पेटलेला असताना मंत्री प्रताप सरनाईकांनी मराठी भाषिकांच्या लोकसंख्येवर बोट ठेवलंय... मीरा-भाईंदरमध्ये फक्त 18 टक्के मराठी मतदार असल्याचं सांगून सरनाईकांनी अमराठी महापौराला अप्रत्यक्ष समर्थन दिलय...
मीरा-भाईंदरमध्ये निर्माण झालेली ही परिस्थिती म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील एका मोठ्या बदलाचे संकेत आहेत. दुर्दैवाने मराठी माणसाची टक्केवारी स्वतः मराठी माणूसच टिकवू शकलेला नाही. त्यात राजकीय पक्षांनी केवळ भविष्यातील मतांच्या गणितासाठी मराठी माणसाला राजकीय प्रक्रियेतूनच हद्दपार केलयं... त्यामुळे मीरा-भाईंदरमध्ये निर्माण झालेली परिस्थिती भविष्यात देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतही पाहायला मिळाली तर आश्चर्य वाटायला नको...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.