Pune Crime News Saam TV
मुंबई/पुणे

Pune Crime News: पुण्यात चाललंय काय? लॉजवर नेऊन अश्लील व्हिडिओ दाखवत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Priya More

अक्षय बडवे, पुणे

Pune News: पुण्यामध्ये गुन्हेगारी (Pune Crime) दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कधी हत्या, कधी जीवघेणा हल्ला तर कधी अत्याचार अशा घटना वारंवार समोर येत आहेत. त्यामुळे गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिला आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जात आहे. अशामध्ये पुण्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लॉजवर नेऊन अश्लील व्हिडिओ (obscene videos) दाखवत या मुलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेमुळे पुण्यामध्ये एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय तरुणाकडून १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना पुण्यामध्ये घडली आहे. पीडित मुलगी आणि तरुण हे दोघे एकमेकांना ओळखतात. हा तरुण गेल्या वर्षभरापासून पीडित मुलीवर अत्याचार करत होता. शेवटी या सर्व प्रकाराला कंटाळून पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेतली. तिने पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी तानाजी (३५ वर्षे) नावाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला.

पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीनुसार, तानाजी कांबळे आणि पीडित मुलगी एका पोलीस अकादमीत ट्रेनिंगला एकत्र होते. तिथेच त्यांची ओळख झाली. याठिकाणीच तानाजीने या मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले. त्यानंतर पीडित मुलीच्या इच्छेविरोधात त्याने तिला तीन ते चार वेळा लॉजवर नेले. त्याठिकाणी आरोपीने अश्लील व्हिडिओ दाखवत पीडित मुलीच्या इच्छेविरोधात शाररिक संबंध ठेवले.

ऐवढ्यावरच न थांबता आरोपी पीडित मुलीला शारीरिक संबंध केल्यानंतर गर्भनिरोधक गोळी खायला द्यायचा. तसंच याबाबत कोणालाही काहीही सांगू नये यासाठी तो पीडित मुलीला वारंवार धमकी देखील देत होता. आरोपीचे हे कृत्य वारंवार सुरुच होते. अखेर या सर्व गोष्टींना कंटाळून पीडित मुलीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीवरुन पोलिसांनी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सहकारनगर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

How To Book IRCTC Tatkal Ticket: रेल्वेचं तात्काळ तिकीट कसं बुक करायचं? वाचा ही संपूर्ण माहिती एका क्लिकवर

Maharashtra News Live Updates: संजय राऊतांनी सांभाळून बोलावं : बच्चू कडू

Explainer : लोकसभा ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुका शक्य आहेत का? 'वन नेशन, वन इलेक्शन'चा फायदा नक्की कोणाला? वाचा सविस्तर

Konkan : कोकणातील 'बटरफ्लाय बीच'चा नजारा इतका भारी की गोवाही विसराल

Maharashtra Politics : अजित पवारांची सावध भूमिका, १० टक्के मुस्लिम उमेदवार मैदानात उतरवणार?

SCROLL FOR NEXT