Nagpur Crime
Nagpur Crime SaamTV
मुंबई/पुणे

नात्याला काळिमा! आजोबांकडूनच नातीचा लैंगिक छळ

मंगेश मोहिते

नागपूर - कपिलनागर पोलीस (Police) स्टेशन हद्दीत आजोबानेच आपल्या 13 वर्षीय नातीवर अत्याचार केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी आजोबाला अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

कपिलनगर ठाण्याच्या परिसरात 62 वर्षीय आजोबाने आपल्या नातीलाच वासनेची शिकार बनविल्याची खळबळजनक घटना घडली. 13 वर्षीय मुलीचा तिच्या आजोबांनी लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. पीडित मुलीची आई ही गर्भवती असल्यामुळे ती आपल्या माहेरी एप्रिल 2021 मध्ये प्रसूतीसाठी आली होती. ती गर्भवती असल्यामुळे मुलीला आजोबांकडे झोपायला पाठवत होती. काही दिवसांपूर्वी पीडित मुलीच्या आईने आजोबा आणि नात दोघांना आपत्तीजनक स्थितीत पाहिले. त्यानंतर आईने मुलीला विश्वासात घेऊन चौकशी केली. मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी आजोबाला अटक केली.

हे देखील पाहा -

दरम्यान दुसरीकडे, नागपूरच्या जरीपटका परिसरात सुद्धा घडली आहे. 24 वर्षीय तरुणाने वस्तीतीलच एका ने 12 वर्षीय बलिकेवर अत्याचार केल्याची घटना घडली आहे. 24 वर्षीय आरोपीचे त्याच्याच वस्तीत राहणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीसोबत व्हॉट्सअॅप चॅटिंगच्या माध्यमातून मैत्री झाली. नंतर हे मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. 24 एप्रिल रोजी मध्यरात्री मुलीचे कुटुंबीय झोपल्यानंतर आरोपीने मुलीला आपल्या घरी बोलावले आणि तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच पीडित तरुणीला जीवे मारण्याची धमकीही दिली. पीडित मुलगी काही दिवस गप्प राहिली. मात्र, त्यानंतर तिने आपल्यासोबत घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर आईने जरीपटका पोलीस स्टेशन गाठून आरोपी मुलाविरोधात तक्रार दिली. या प्रकरणी पोलिसांकडून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hair Care Tips: Dry Hair च्या समस्येने हैराण? घरगुती तूपाच्या मदतीने दूर करा समस्या…

Sangli Constituency : प्रकाश शेंडगे यांच्या कारवर चपलांचा हार आणि शाईफेक; रायकीय वर्तुळात खळबळ

Mumbai University Exams: विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या; पाहा नवीन वेळापत्रक

Shirur Loksabha: अमोल कोल्हेंसाठी शरद पवार मैदानात! शिरुर मतदार संघात घेणार ५ सभा

Today's Marathi News Live: पंतप्रधान मोदी १० मेला नाशिक दौऱ्यावर येणार, पिंपळगामध्ये जाहीर सभा घेणार

SCROLL FOR NEXT