Girish Mahajan  Saam TV
मुंबई/पुणे

Girish Mahajan : मंत्री गिरीश महाजन यांनी नाकारली अतिरिक्त Y+ सुरक्षा; सांगितले नाकारण्याचे नेमके कारण

भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाची अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली आहे.

साम टिव्ही ब्युरो

सुशांत सावंत

Girish Mahajan News : भाजप नेते, मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाची अतिरिक्त Y+ सुरक्षा नाकारली आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलीस महासंचालक यांना पत्र लिहून पोलिसांची अतिरिक्त वाय+ सुरक्षा नाकारत असल्याचे कळविले. (Latest Marathi News)

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या वतीने ग्रामविकास व पंचायत राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना दि.०९ नोव्हेंबर २०२२ पासून सुरक्षेच्या कारणास्तव अतिरिक्त वाय+ (Y+) सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली होती.

मात्र, मंत्री महाजन यांनी अतिरिक्त वाय+ सुरक्षा नाकारल्याचे पत्राद्वारे राज्याचे पोलीस महासंचालक यांना कळविले आहे. अशा आशयाचे पत्र मंत्री गिरीश महाजन यांनी राज्याचे पोलिस महासंचालक यांना दिनांक २८ नोव्हेंबर २०२२ रोजी पाठवले आहे.

या पत्रात महाजन यांनी म्हटले आहे की, सध्या राज्यातील कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिस यंत्रणा नेहमी तत्पर असते. मात्र सध्या राज्यातील पोलीस यंत्रणेची उपलब्ध संख्या तसेच पोलिस कर्मचाऱ्यांवरील वाढता कामाचा ताण याचबरोबर पोलिस विभागातील वाहनांची कमतरता आहे. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करता मला पुरवण्यात आलेली अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था काढून घेण्यात यावी'.

गिरिश महाजन पुढे म्हटले आहे,' सुरक्षा व्यवस्था काढून हटविण्याबाबतचे आदेश संबंधितांना योग्य ते आदेश देण्यात यावेत असे मंत्री गिरीश महाजन यांनी पोलिस महासंचालक यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे'. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी सुरक्षा व्यवस्था नाकारण्याच्या घेतलेल्या निर्णयांचे समाजातील सर्व घटकांतील लोकांनी सकारात्मक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss 20: बादशाहसोबत डिव्होर्सनंतर ईशा रिखीची 'बिग बॉस २०'मध्ये एन्ट्री; म्हणाली, 'प्रेक्षकांना लवकरच सत्य...'

जेएनयूच्या प्राध्यापकावर लैंगिक छळाचा आरोप, 11विद्यार्थ्यांच्या तक्रारीने खळबळ

नगरपालिका-नगरपंचायतींसाठी महत्त्वाची अपडेट! नगराध्यक्षांच्या सहीचा अधिकार रद्द

मधुचंद्राच्या रात्रीत पान का खायला दिलं जातं? कोणालाच माहिती नाहीये हे भन्नाट कारण?

Bigg Boss 20: बिग बॉस २०साठी सलमान खानची फी किती? जाणून घ्या यंदाच्या सीझनमध्ये काय आहे खास

SCROLL FOR NEXT