Lalit Patil Case Saam tv
मुंबई/पुणे

Lalit Patil Case: अंधारेंकडून प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप, त्यांचा बोलविता धनी कोण? ललित पाटील प्रकरणावरून मंत्री भुसे यांचा सवाल

Lalit Patil Case: सुषमा अंधारे यांच्या मागणीनंतर मंत्री दादा भुसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

Vishal Gangurde

सूरज मसुरकर

Dada Bhuse News:

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला ड्रग्ज माफिया ललित पाटील याच्या चेन्नईतून मुंबई पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. याच ललित पाटील प्रकरणावरून राज्याचं राजकारण ढवळून निघालंय. या प्रकरणावरून ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यात राजकीय लोकांचा सामावेश आहे. या प्रकरणात दादा भुसे, शंभुराज देसाईंची नार्को टेस्ट करावी, अशी मागणी केली आहे. सुषमा अंधारे यांच्या मागणीनंतर मंत्री दादा भुसे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. (Latest Marathi News)

ललित पाटील प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणावरून सुषमा अंधारे यांनी सत्ताधारी मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. अंधारे यांच्या आरोपानंतर मंत्री दादा भुसे यांनी तपासातून सर्व गोष्टी समोर येतील, असं म्हटलं आहे.

मंत्री दादा भुसे म्हणाले, 'दोन-चार दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी आरोप केले होते. त्यावेळी मी सांगितलं होतं की, 'मी आंतरराष्ट्रीय पातळीच्या चौकशीला सामोरे जाण्यास तयार आहे. मी एक महिला म्हणून त्यांचा आदर केला'.

'सुषमा अंधारे या त्या दिवशी म्हणाल्या की, 'माझं समाधान झालंय'. त्यामुळे माझ्या दृष्टीकोनातून हा विषय संपला आहे. त्यांना प्रसिद्धीच्या हव्यासापोटी आरोप करायचे असेल तर त्यांचा बोलविता धनी कोण आहे? त्यांना या प्रमुख विषयावरील लक्ष विचलीत करायचं आहे. मात्र, या प्रकरणातील तपासातून सर्व गोष्टी समोर येतील, असे दादा भुसे पुढे म्हणाले.

'सुषमा अंधारे यांना एवढी घाई कसली आहे? हे सर्व चौकशीतून समोर येणार आहे. तसेच ललित पाटील यांच्या आईकडे जर काही पुरावे असलतील तर त्यांनी यंत्रणेकडे द्यावेत, असेही भुसे यांनी म्हटलं आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

काय म्हणाल्या होत्या सुषमा अंधारे?

'ललिल पाटील प्रकरणाचा तपास करायला हवा. या प्रकरणात राजकीय लोक आहेत. दादा भुसे, शंभुराज देसाई यांची नार्को टेस्ट करा, असे अंधारे यांनी मागणी केली. 'आज देवेंद्र फडणवीस पुण्यात आहेत. ललित पाटीलने ज्या हॉटेलमधून पलायन केले, त्याच लेमनट्री हॉटेलमध्ये देवेंद्र फडणवीस येणार आहेत. त्या हॉटेलमध्ये बैठक होणार आहे', असे ते पुढे म्हणाले.

'राज्यात कायदा, सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे ललित पाटीलचा जय सिंघानिया होऊ नये, असा टोला देखील अंधारे यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Saina Nehwal: सायना नेहवाल - पारूपल्ली कश्यप विभक्त, ७ वर्षांचा सुखी संसार मोडला; सोशल मीडिया पोस्ट चर्चेत

Plane Crash: उड्डाण घेताच काही सेकंदात विमान कोसळलं, उडाला मोठा भडका; परिसरात काळेकुट्ट धुरांचे लोट; अपघाताचा थराराक VIDEO

Wardha News : अहमदाबाद-हावडा एक्स्प्रेसमध्ये सीटवर बसण्यावरून वाद; तरुणाकडून प्रवाशावर ब्लेडने सपासप वार

Viral Video: मी आता आझाद झालोय! घटस्फोटाच्या आनंदात पठ्ठ्याची दुधाने अंघोळ, व्हिडिओ व्हायरल

Stunt Artist Raju Death : सिनेमाच्या सेटवर मोठी दुर्घटना; प्रसिद्ध कलाकाराचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT