Chandrakant Patil Saam TV
मुंबई/पुणे

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटलांच्या सुरक्षेत वाढ; घराबाहेरही पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त, काय आहे कारण?

राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Dnyaneshwar Choutmal

Chandrakant Patil Latest News : राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर येतेय. भाजप नेते आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील यांच्या आजूबाजूला पोलिसांचा मोठा फौजफाटा पाहायला मिळत आहे. याशिवाय त्यांच्या पुण्यातील घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे. महापुरूषांवर आक्षेपार्ह विधान केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती.  (Latest Marathi News )

याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना ताब्यात सुद्धा घेतलं आहे. त्यांच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल केले आहेत. तसंच काही पोलीस अधिकाऱ्याचंही निलंबन करण्यात आलं आहे. 'शाईफेकीचा हा कट पूर्व नियोजित होता आणि याचे सर्व पुरावे मिळाले आहेत', असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटलांनी केला होता.

'माझ्या डोळ्याला काही वर्षांपूर्वी कॅन्सर झाला होता. त्यामुळे डोळ्याच्या आतील भागाचे मोठे ऑपरेशन करावे लागले होते. त्यावर शाई टाकली गेली. निषेध करायला हरकत नाही, पण मग मला मारण्याचा हा प्रयत्न होता का?' असा सवाल चंद्रकांत पाटलांनी  (Chandrakant Patil) उपस्थित केला होता.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते?

चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमादरम्यान कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडरकर आणि महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या. शाळा सुरु करताना त्यांना सरकारने अनुदान दिलं नाही.तर त्यांनी लोकांकडे भीक मागितली. शाळा चालवतोय, पैसे द्या. तेव्हाच्या काळात १० रुपये देणारे लोकं होती. आता १०/१० कोटी रुपये देणारे लोक आहेत, असं विधान केलं होतं.

त्यांच्या या विधानानंतर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली होती. शाईफेकीच्या घटनेनंतर त्यांच्या सुरक्षेत प्रचंड वाढ करण्यात आली आहे. चंद्रकांत पाटील जिथे जिथे जात आहेत त्या ठिकाणी स्थानिक पोलीस स्टेशनच्या पोलिसांबरोबर (Police) क्राईम ब्रांचचे पाच पोलीस अधिकारी तैनात करण्यात येत आहेत. चंद्रकांत पाटील यांची गाडी ज्या रस्त्यावरून जाणार आहे त्या रस्त्यावर वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात येत आहे.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Prem Birhade News : पुण्याच्या कॉलेजचा 'मॉडर्न' जातीयवाद? तरुणाला गमवावी लागली लंडनमधील नोकरी, VIDEO

Mumbai Crime : मुंबईत अनेक घरे; २०० पेक्षा जास्त चेले; बांगलादेशी किन्नरजवळ सापडलं कोट्यवधींचं घबाड

Maharashtra Live News Update : जालन्यातील लाचखोर आयुक्ताला कोर्टाचा दणका, जामीन फेटाळला

Telangana Band: महाराष्ट्रानंतर तेलंगणामध्ये आरक्षणाचा वाद पेटला; तोडफोडीनंतर अनेक शहरं ठप्प

अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्यूवर संतापले जय शाह, BCCI नेही केला निषेध; आता पाकिस्तानच काही खरं नाही!

SCROLL FOR NEXT