chandrakant patil  saam tv
मुंबई/पुणे

Chandrakant Patil | नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिक्षणाचे भगवीकरण होतंय का ? चंद्रकांत पाटील म्हणाले...

कार्यक्रमाच्या मुलाखतीत साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्ना जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिक्षणाचे भगवीकरण होतंय का ? असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला.

साम टिव्ही ब्युरो

प्राची कुलकर्णी

chandrakant Patil News : आज, शुक्रवारी 'सकाळ आयडॉल्स ऑफ महाराष्ट्र' या कार्यक्रमात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी उपस्थिती दर्शवली आहे. या कार्यमातील मुलाखतीत उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेतील विविध मुद्यांवरील प्रश्नांवर बेधडक उत्तरे दिली. या कार्यक्रमाच्या मुलाखतीत साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्ना जोशी यांनी नवीन शैक्षणिक धोरणाच्या शिक्षणाचे भगवीकरण होतंय का ? असा प्रश्न मंत्री चंद्रकांत पाटील यांना विचारला. प्रसन्ना जोशी यांच्या प्रश्नाला मंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी गुरुकूल व्यवस्थेचे उदाहरण देत उत्तर दिलं आहे.

सकाळ माध्यम समूह ९० वर्ष पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने शैक्षणिक क्षेत्रातील संस्थांचा सन्मान केला जात आहे. यात शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या aissms, भारती विद्यापीठ, सिंहगड संस्था, प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन संस्था अशा वेगवेगळ्या १७ संस्थांचा सन्मान केला जात आहे. या निमित्ताने शिक्षण क्षेत्रातील धोरणात्मक मुद्यांचा देखील उहापोह केला जात आहे.

या कार्यक्रमात उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील तसेच शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते 'आयडॉल ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार दिले जाणार आहेत. तसेच या कार्यक्रमाला सकाळ माध्यम समूहाचे सीईओ उदय जाधव देखील उपस्थित होते. यावेळी साम टीव्हीचे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी आणि पुणे सकाळचे निवासी संपादक सम्राट फडणीस यांनी उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याशी संवाद साधला. त्यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोघांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली.

चंद्रकांत पाटील शिक्षणाच्या भगवीकरणावर म्हणाले की, 'आज अनेक ठिकाणी शिक्षण गुरूकुल प्रमाणे सुरू आहे. गुरुकुलमध्ये रोज आरती चालत नाही. तिथे घोड्यावर हत्तीवर बसायला शिकवतात. आम्ही त्या दिशेने आहोत'. शिक्षकांच्या कौश्यलावर भाष्य करताना चंद्रकांत पाटील म्हणाले, 'पुण्यात सरकारने प्राध्यापकांच्या प्रशिक्षणासाठी संस्था विकसित केली आहे. ती पाहून मी अंतर्मुख झालो. ७४ हजार जणांना प्रशिक्षण देण्याची त्यांची इच्छा आहे. हे सरकारने लक्ष दिलेला उपक्रम आहे'.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

असंख्य घरांमध्ये लपलीये एक मांजर; तुम्ही १० सेकंदात शोधून दाखवाच!

Solapur Airport: सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी! सोलापूरकरांना आता मुंबई आणि गोव्यासाठी करता येणार हवाई सफर

Jui Gadkari: जुई गडकरी शुटिंग सुरू असताना सेटवर फावल्या वेळेत काय करते? Video केला शेअर

Pav Bhaji: घरच्या घरी स्ट्रीट स्टाईल पावभाजी कशी बनवायची?

Maharashtra News Live Updates: रत्नागिरीत अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या

SCROLL FOR NEXT