Reduce Burden on Students : विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील शिंदे सरकार (Eknath Shinde) मोठा निर्णय घेण्याच्या तयारी आहे. आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचा (Students) होमवर्क बंद करण्याच्या तयारीत असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळून शकतो. कारण, शाळेतच नोट्स काढून विद्यार्थ्याचा अभ्यास घेतला जाणार आहे.
राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांच्या माहितीनुसार, पुढील वर्षीपासून म्हणजेच 2023 पासून पहिली ते आठवी इयत्तेपर्यंतच्या विद्यार्थ्यांना असणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांमध्ये वह्यांची पाने जोडण्यात येणार आहे. म्हणजेच मुलांना त्यांच्या वर्गात जी पुस्तके येतील त्या पुस्तकांमध्ये तीन ते चार भागांत विभागणी झालेली असेल. यामध्ये कोरी पाने उत्तरे लिहिण्यासाठी दिली जाणार आहे.
विद्यार्थ्यांचे होमवर्क रद्द करण्याची शिक्षण विभागाची तयारी
याबाबत माहिती देताना शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर म्हणाले की, पुढील शैक्षणिक वर्षात शाळेतच नोट्स काढून विद्यार्थ्यांना अभ्यास घेतला जाणार असल्याचा सरकारचा प्रयत्न आहे. यासोबतच विद्यार्थ्यांच्या पाठिवरचं ओझं सुद्धा कमी करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू मागचा असल्याचं केसरकरांनी सांगितलं आहे.
पुढील वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. या निर्णयानुसार पुस्तकाची तीन किंवा चार विभागात विभागणी केली जाऊ शकते आणि मुलांना शाळेत जाताना आता वह्या आणि पुस्तके यांपैकी आता एकच वस्तू शाळेमध्ये विद्यार्थ्यांना न्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या पाठ्यपुस्तकांमध्ये एखादा धडा संपला की लगेच काही कोरी पाने उत्तरे लिहिण्यासाठी दिली जाऊ शकतात.
Edited By - Satish Daud
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.