King Cobra Mongoose Fight : मुंगूस आणि सापाचं वैर सर्वांनाच माहित आहे. सोशल मीडियावर अनेकदा तुम्ही साप आणि मुंगूसाचे व्हिडीओ पाहिले असतील. मुंगूस बघितला तर साप पळून जाण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओत मुंगूसाने झाडावर चढलेल्या सापाची शिकार केलीये. (Mongoose and Snake Fight Video)
तसं पाहता साप आणि मुंगूसाचे युद्ध काही नवीन नाही. पण व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या नेटकऱ्यांना भावूक करतोय. मुंगूस साप मारण्यात पटाईत असले तरी मुंगूसापासून आपला जीव वाचवण्यासाठी साप नवनवीन युक्त्या शोधत असतात. यामध्ये काही वेळा सापाचा जीव वाचतो तर काही वेळा त्याची शिकार होते.
व्हायरल झालेल्या व्हिडीओत एक साप झाडावर चढलेला दिसत आहे. त्याचवेळी एक मुंगूस या सापाची शिकार करण्यासाठी झाडाखाली उभा आहे. मुंगूसापासून आपला जीव वाचवण्यासाठी हा साप झाडाच्या फांदीवर चढलेला दिसतोय. या सापाची शिकार करण्यासाठी मुंगूस देखील झाडाच्या आसपास चकरा मारताना दिसत आहे. (King Cobra Mongoose Viral Video)
काही वेळ झाडाखाली चकरा मारल्यानंतर मुंगूसाची नजर या सापावर पडते. त्यातच झाडाच्या फांदी लहान असल्याने मुंगूसाला सापाची शिकार करणं सोपं जाते. झाडाच्या फांदीवर साप लपत असल्याचं दिसताच मुंगूस अचानक उंच उडी घेतो आणि सापाला फांदीवरून खाली खेचण्याचा प्रयत्न करतो.
दरम्यान, मुंगूसाच्या तोंडात फणा आल्यानंतरही साप प्रतिकार करण्याचा प्रयत्न करतो. शेपटीने फांदी घट्ट पकडत तो कसाबसा या मुंगूसाच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करतो. मात्र तरी देखील मुंगूस काही सापाला सोडत नाही. झाडावरून खाली खेचल्यानंतर मुंगूस सापाला घेऊन पळून जातो. (Snake And Mongoose Fight Video)
अंगावर काटा आणणारा हा थरार नाशिक जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं जातंय. स्थानिकांनी साप आणि मुंगूसाच्या या थराराचा व्हिडीओ आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलाय. हा व्हिडीओ उप वन संरक्षक, नाशिक (पश्चिम) ट्विटर अकाउंटवरून शेअर करण्यात आलाय. व्हिडीओ जुना असला तरी सोशल मीडियावर तो तुफान व्हायरल होतोय.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.