Viral Video: गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात लाखो रुपयांची उधळण...(पहा Video) चेतन इंगळे
मुंबई/पुणे

Viral Video: गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात लाखो रुपयांची उधळण...(पहा Video)

विरारमध्ये गुजराती समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात लाखो रुपयांच्या पैशाचा पाऊस पडला आहे.

चेतन इंगळे साम टीव्ही वसई विरार

मुंबई: विरारमध्ये गुजराती (Gujarati) समाजाच्या धार्मिक कार्यक्रमात लाखो रुपयांच्या पैशाचा पाऊस पडला आहे. प्रसिद्ध गुजराती गायिकेच्या गाण्यावर (song) ताल धरत तिच्या अंगावर शेकडो जणांनी नोटांचे बंडलच्या बंडल उधळले आहेत.

पहा व्हिडिओ-

पैशांचे (money) नोटांचे बंडल उधळतानाचा व्हिडीओ (Video) सोशल मीडियावर (Social media) सध्या प्रचंड प्रमाणात व्हायरल (Viral) झाला आहे. या व्हिडिओच्या (Video) प्रकारावरून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्वयं चैतन्य शक्तीधाम गोशाळाच्या माध्यमातून विरारच्या (Virar) रायपाडा येथे शनिवारी रात्री या कार्यक्रमाचे आयोजित केले होते.

हे देखील पहा-

राजस्थान (Rajasthan) मधील प्रसिद्ध गायिका कच्छ कोकिळा गीताबेन रबारी, संतवणी आराधक गोविंदभाऊ गाढवी, लोक साहित्यिकार प्रतापदान गाढवी यांच्या गाण्याचा हा धार्मिक कार्यक्रम होता.

शनिवारी मध्यरात्री उशिरापर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. गाणे चालू असताना एकामागून एक जण येऊन पैशाची उधळण करत असतानाचे व्हिडीओ मध्ये दिसत आहे. विरार सह मीरा भाईंदर ठाणे व आजूबाजूच्या गावातील गुजराती समाजातील हौशी मंडळींनी या कार्यक्रमात हजेरी लावली होती.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

KDMC Mayor Reservation : कल्याण डोंबिवलीचा महापौर कोण होणार? आरक्षण जाहीर, वाचा

Maharashtra Live News Update : किशोरी पेडणेकरांकडून महापौर सोडतीवर आक्षेप

BMC Mayor: मुंबई महापालिकेत खुल्या वर्गाला आरक्षण, महापौरपदी कोण विराजमान होणार?

Mayor Reservation : तुमचा महापौर कोण? मुंबई, पुण्यासह २९ महापालिकांसाठी आरक्षण सोडत जाहीर, सर्व यादी एका क्लिकवर

Single Strip Blouse Designs: ब्लाऊजची फक्त एकच पट्टी, साडीवर उठून दिसण्यासाठी ब्लाऊजचे 5 स्टायलिश पॅटर्न

SCROLL FOR NEXT