Udddhav Balasaheb Thackeray Saam TV
मुंबई/पुणे

Shivsena: निवडणूक आयोगानं शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यानंतर मिलिंद नार्वेकरांचं सडेतोड ट्विट, म्हणाले आमचे चिन्ह...

Shivsena Latest News: शिवसेनेतील ठाकरे गटाचं चिन्ह काय याबाबत नार्वेकरांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे.

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

मुंबई: निवडणुक आयोगाने शिवसेनेचं (Shivsena) धनुष्यबाण चिन्ह गोठवल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. काल, शनिवारी निवडणुक आयोगाने हा निर्णय दिला. तसेच ठाकरे गट आणि शिंदे गट या दोन्ही गटांना धनुष्यबाण या चिन्हाऐवजी निवडणुक आयोगाकडे उपलब्ध असलेले चिन्ह निवडण्याचे आदेश निवडणुक आयोगाने दिले आहेत. यावर शिवसेनेचे सचिव आणि मिलिंद नार्वेकरांनी (Milind Narvekar) सूचक ट्विट केलं आहे. शिवसेनेतील ठाकरे गटाचं चिन्ह काय याबाबत नार्वेकरांनी विरोधकांना सूचक इशारा दिला आहे. (Shivsena Latest News)

शिंदे गट आणि ठाकरे गटाला धनुष्यबाण चिन्ह वापरता येणार नाही. शिंदे गट आणि ठाकरे गटाने आयोगाकडे धनुष्यबाण चिन्हासाठी कागदपत्रे सादर केली होती. तसंच शिवसेना नाव वापरण्याबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना शिंदे सेना आणि शिवसेना ठाकरे सेना असं नाव दोन्ही गट वापरू शकतात, अशीही माहिती समोर आली आहे. याबाबत शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी सडेतोड ट्विट केलं आहे.

मिलिंद नार्वेकर यांनी वाघाचा फोटो ट्विट करत आमचे (ठाकरे गटाचे) चिन्ह हे उद्धव बाळासाहेब ठाकरे असल्याचं म्हणाले आहेत.

दरम्यान, निवडणुक आयोगानं अंधेरी पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना उद्या, म्हणजे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत आपापलं चिन्ह निवडण्याचे आदेश दिले आहेत.

केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले 'हे' आदेश

  • दोन गटांपैकी कोणीही शिवसेना हे नाव वापरू शकणार नाही.

  • दोन्ही गटांपैकी कोणालाही "धनुष्य आणि बाण" हे चिन्ह वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही.

  • दोन्ही गट त्यांच्यासाठी निवडतील अशा नावांनी ओळखले जातील.

  • संबंधित गट,त्यांना हवे असल्यास,त्यांच्या मूळ पक्षाशी जोडणारं चिन्ह निवडू शकतात

  • दोन्ही गटांना ते निवडतील वेगवेगळी चिन्हे देखील दिली जातील. निवडणूक आयोगाने अधिसूचित केलेल्या मुक्त चिन्हांच्या यादीतून निवड करावी लागेल.

  • सध्याच्या पोटनिवडणुकासाठी दोन्ही गटांना याद्वारे 10 ऑक्टोबर 2022 दुपारी एक वाजेपर्यंत सादर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

  • (i) त्यांच्या गटांच्या नावांना ज्याद्वारे आयोगा मान्यता देईल आणि त्यासाठी

    प्राधान्य क्रमाने तीन पर्याय द्या,त्यापैकी कोणीही असू शकतो.

  • (ii) उमेदवारांना जे चिन्ह वाटप केले जाऊ शकतात, जर असतील तर

    संबंधित गटामध्ये तीन मुक्त चिन्हांची नावे सूचित करू शकतात.

  • त्यांच्या पसंतीचा क्रम,त्यापैकी कोणालाही त्यांच्या उमेदवारांना वाटप केले जाऊ शकते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai: मुंबईकरांसाठी गुड न्यूड! सांताक्रूझ ते चेंबूर प्रवास सुसाट, फक्त ३५ मिनिटांत पोहचणार

Maharashtra Live News Update: - पुणे आहिल्यानगर महामार्गावर रांजणगाव येथे वाहतुककोंडी

Health Tips: फळं खाल्ल्यानंतर पचण्यासाठी किती वेळ लागतो?

शुभमन गिल ठरला जगातला एकमेव खेळाडू; ICC कडून चौथ्यांदा खास पुरस्कार

Dhule MIM : धुळ्यात एमआयएमला मोठा धक्का; जिल्हा कार्यकारिणीचा सामूहिक राजीनामा

SCROLL FOR NEXT