Midnight fire in Mankhurd saam tv
मुंबई/पुणे

Mankhurd Fire: मानखुर्दमध्ये मध्यरात्री अग्नितांडव! भंगार कंपाऊंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत मोठं नुकसान

Mankhurd News: गोदामात ज्वलनशील पदार्थ आणि इतर वस्तू होत्या, त्यामुळे आग वेगाने पसरली आणि काही वेळात तिने भीषण रूप धारण केले.

जयश्री मोरे

Mankhurd Fire News: मानखुर्द परिसरातील एका स्क्रॅप गोडाऊनला मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. मध्यरात्री अडीच ते तीनच्या सुमारास ही आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगिवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु केले.

अग्निशमनदलाने आगीवर पुर्णपणे नियंत्रण मिळवले असून सुदैवाने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. घटनास्थळी सध्या कुलिंगच काम सुरू आहे. आगीची माहिती मिळताच स्थानिक पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. गोदामात ज्वलनशील पदार्थ आणि इतर वस्तू होत्या, त्यामुळे आग वेगाने पसरली आणि काही वेळात तिने भीषण रूप धारण केल्याचे सांगण्यात येत आहे.

ही आग एवढी भीषण होती की आगीचे आणि धुराचे लोळ दूरवर दिसत होते. अग्निशमन दलाच्या सुमारे डझन गाड्यांच्या सह्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही असे वृत्त आहे. भंगार कंपाऊंडला लागलेल्या आगीमागील कारणांचा पोलीस तपास करत आहेत. (Mumbai Fire)

अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'आम्हाला सकाळी ७.३० वाजता आग लागल्याची माहिती मिळाली. यानंतर अग्निशमन दलाच्या १२ गाड्या आग विझवण्याच्या कामासाठी तैनात करण्यात आल्या. आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही". (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: मनसे नेते अमित ठाकरे नेरुळमध्ये शिवस्मारकास अभिवादन करणार

Maharashtra Politics : मनसेसोबत आघाडीवरुन काँग्रेसमध्ये मतभेद; वडेट्टीवारांचं समर्थन, गायकवाडांचा विरोध, VIDEO

Maharashtra Politics : दादांची मतदारांवर दादागिरी? अजितदादांची 'अर्थ'पूर्ण दहशत? VIDEO

Maharashtra Politics: ऑपरेशन लोटसमध्ये शिंदेंचे 35 आमदार फुटणार? भाजपकडून शिंदेंची कोंडी?

शिवसेनेचे एबी फॉर्म राष्ट्रवादीच्या आमदाराकडे; नगराध्यक्ष आणि वीस ते पंचवीस उमेदवारांना अपक्ष लढावं लागलं

SCROLL FOR NEXT