BJP Leader Arun Dev to Write to CM After Midnight Firecracker Mishap Saam
मुंबई/पुणे

भाजप नेत्याच्या बेडरूमला आग, रॉकेट थेट बाल्कनीत घुसला; मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवलं अन्..

BJP Leader Arun Dev to Write to CM After Midnight Firecracker Mishap: अंधेरी पश्चिम येथील अरूण देव यांच्या फ्लॅटमध्ये फटाक्यांमुळे आग लागली. एसी युनिट जळून खाक. सुदैवाने जीवितहानी टळली.

Bhagyashree Kamble

  • अंधेरी पश्चिम येथील धक्कादायक घटना.

  • भाजप नेत्याच्या बेडरूमला आग.

  • रॉकेट फटाक्यामुळे आग लागल्याची माहिती.

अंधेरी पश्चिम येथून मोठी बातमी समोर येत आहे. माजी उपमहापौर आणि भाजप नेते अरूण देव यांच्या घरात फटाक्यांमुळे आग लागली. रॉकेट थेट अरूण देव यांच्या बाल्कनीत घुसला. रॉकेट थेट बेडरूमच्या बाल्कनीत आदळला. रॉकेटमुळे एसी युनिटला आग लागली. दरम्यान, सुरक्षा रक्षक आणि शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठे नुकसान टळले.

अंधेरी पश्चिम येथील प्रथमेश हाऊसिंग को - ऑपरेटिव्ह सोसायटीमध्ये भाजप नेते अरूण देव यांच्या बी/ ११०२ या फ्लॅटमध्ये मध्यरात्री फटाक्याच्या रॉकेटमुळे भीषण आग लागली. रॉकेट थेट बेडरूमच्या बाल्कनीत घुसले. यामुळे एसी युनिटला आग लागली. एसी युनिट जळून खाक झाले. मात्र, सुरक्षा रक्षक आणि शेजाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली.

या घटनेनंतर अरूण देव यांनी सोसायटी परिसरात फटाक्यांच्या वापराबाबत कठोर नियमांची गरज असल्याचं सांगितलं. धोकायदायक फटाक्यांचा वापर बंद करण्यात यावा. तसेच रात्री साडे दहा नंतर फटाके फोडण्यास सक्त मनाई असावी, अशी यावेळी त्यांनी विनंती केली आहे.

तसेच नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी सोसायटीत अधिकृत अधिकारी नेमावा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून संबंधित मागणी सादर करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chapati Side Effects: चपातीमुळे वाढतं वजन अन् शुगर वाढते का? अमेरिकन ऑर्थोपेडिक डॉक्टरांचा महत्वाचा सल्ला

मोठी बातमी! स्मृती मानधनाचं लग्न मोडलं, इन्स्टाग्रामवर पोस्ट करत दिली माहिती

Maharashtra Live News Update: गोरेगाव आरे कॉलनी परिसरात मोठा अपघात

Vidarbha : वेगळ्या विदर्भाची मागणीने राजकारण तापले, नेमकं काय म्हणाले ? पाहा व्हिडिओ

३ हजारांत तरूणीचा सौदा; द ताज पेइंग गेस्ट हाऊसमध्ये सेxxx रॅकेटचा अड्डा, 'असा' उघडा पडला आरोपींचा डाव

SCROLL FOR NEXT