MIDC News Saam Tv
मुंबई/पुणे

MIDC News: उद्योगमंत्र्यांच्या धाडीनंतर एमआयडीसी अ‍ॅक्शन मोडवर; पाणी चोरणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर धडक कारवाई

Uday Samant News : डोंबिवली येथील संदप गावात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धाड टाकली. त्यानंतर डोंबिवली ग्रामीण भागातील अनधिकृत नळ जोडण्याचा प्रश्न हा समोर आला होता.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत देशमुख

Dombivli News: उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या डोंबिवली संदपगाव येथील धाडीनंतर एमआयडीसी अ‍ॅक्शन मोडवर आलीये. एमआयडीसीच्या पथकाने डोंबिवली ग्रामीण परिसरात एमआयडीसीच्या पाईप लाईनवर अनधिकृतपणे टॅपिंग करणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू केलीये.

काल दिवसभरात एमआयडीसीच्या पथकाने एमआयडीसीच्या पाईप लाईन अनधिकृतपणे टॅपिंग करणाऱ्या १२ सर्व्हिस सेंटरवर धडक कारवाई करत त्यांच्या विरोधात मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. (Latest Marathi News)

डोंबिवली येथील संदप गावात उद्योग मंत्री उदय सामंत यांनी धाड टाकली. त्यानंतर डोंबिवली ग्रामीण भागातील अनधिकृत नळ जोडण्याचा प्रश्न हा समोर आला होता. उद्योग मंत्र्यांच्या धाडसत्रानंतर एमआयडीसी (MIDC) आणि कल्याण डोंबिवली (Dombivli) महानगर पालिका खडबडून जागी झालीये.

एमआयडीसीच्या पथकाने काल खेणि गाव ते काटई गाव नाका दरम्यान असलेल्या सर्विस सेंटरची पाहणी केली. यादरम्यान या रस्त्यालगत असलेल्या तब्बल 12 सर्विस सेंटरमध्ये एमआयडीसीच्या पाईपलाईनमधून अनधिकृतपणे टॅपिंग करून पाणी कनेक्शन घेण्यात आल्याचं निदर्शनास आलं.

हे अनधिकृत कनेक्शन कापून या पाणीचोरीबाबत एमआयडीसी प्रशासनाने या 12 सर्विस सेंटरविरोधात गुन्हे दाखल केले आहेत. इथून पुढे देखील ही कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचं एमआयडीसी कडून सांगण्यात आलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gopichand Padalkar New Song: 'आमच्या नादाला लागण्याआधी...'; भाजप आमदाराच्या गाण्याने सोशल मीडियात कल्ला

Mayor Election: ठाण्याचा कारभारी ठरला; कोण बनलं महापौर, कोण असणार उपमहपौर? जाणून घ्या

Aadhaar Update: आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा दुरुस्त

Nashik Tourism: 'व्हॅलेंटाईन डे'ला पार्टनरसोबत फिरण्याचा प्लान करताय? नाशिकपासू ४५ किमीवर आहे हे सुंदर हिल स्टेशन

राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्षपद कुणाकडे? प्रफुल्ल पटेल यांनी विषय संपवला, वाचा काय म्हणाले

SCROLL FOR NEXT