Thane Water Supply google
मुंबई/पुणे

Thane News : ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 48 तास बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

ठाणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. एमआयडीसीच्या जलशुद्धीकरण केंद्रातल्या पाणीपुरवठा कपातीमुळे ठाण्यातल्या अनेक भागांमध्ये २६ ते २८ जूनदरम्यान २८ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Sakshi Sunil Jadhav

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील काही भागांमध्ये येत्या दोन दिवसांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) बारवी, जांभूळ आणि शहाड जल शुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणी पुरवठा कपात करण्यात आल्यामुळे हा परिणाम सर्वसामान्यांना भोगावा लागणार आहे. याच समस्येमुळे ठाणे महापालिकेने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन दिले आहे.

अलनिनो आणि आयओडी यांच्या प्रभावामुळे यंदाचा पावसाळा उशिरा सुरू झाल्यामुळे पाणीटंचाईला सामोरं जावं लागत आहे. पण भविष्यात पाणीटंचाई होऊ नये म्हणून जलसंपदा विभागासोबत १९ जून २०२६ रोजी झालेल्या आढावा बैठकीत पाणी कपातीचा निर्णय घेतला.

जलसंपदा विभागाच्या निर्णयानुसार एमआयडीसीच्या शहाड येथील जलशुद्धीकरण केंद्रातून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार, 26 जून 2026 रोजी रात्री 12 वाजल्यापासून ते रविवार, 28 जून 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत, म्हणजेच सलग 48 तास बंद राहणार आहे. तसेच या कालावधीत ठाणे महानगरपालिकेच्या दिवा, मुंब्रा आणि कळवा परिसरातील बऱ्याच भागांना पाणीपुरवठा होणार नाही.

तसेच वागळे प्रभाग समितीअंतर्गत रुपादेवी पाडा, किसननगर क्रमांक 2 आणि नेहरूनगर या भागांनाही पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. मानपाडा प्रभाग समितीच्या हद्दीतील कोलशेत खालचा गाव येथेही पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची कृपया नागरिकांनी नोंद घ्यावी. सदर पाणी कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या खाद्यतेलाच्या ट्रकला भीषण आग, वाहतूक विस्कळीत

जिंकलात तर यंत्रणा प्रामाणिक अन् हरलात तर फेरफार कशी? निवडणूक आयोगाच्या समर्थनार्थ १२४ IAS अधिकारी मैदानात

Blood Sugar Control Tips: ब्लड शुगर कमी करण्यासाठी दररोज किती वेळ चालावे? जाणून घ्या नियमित चालण्याचे सोपे नियम

Bay Leaf Water For Kidney Stones: किडनी स्टोनवर तेजपत्याच्या पाण्याचा घरगुती उपाय, एकदा नक्की करून पाहा

Saree Designs: महिलांनी नऊरात्रीत नेसा 9 प्रकारच्या 9 साड्या, लेटेस्ट डिझाईन्स पाहा

SCROLL FOR NEXT