MHADA Redevelopment Jackpot Saam
मुंबई/पुणे

म्हाडाची बंपर लॉटरी, गोरेगावच्या रहिवाशांना जॅकपॉट लागणार; पुनर्विकास योजनेअंतर्गत घरे मिळणार

MHADA Redevelopment Jackpot: मुंबईतील गोरेगाव पश्चिमेत ३,७००हून अधिक रहिवाशांची घराची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. म्हाडाच्या पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत १६०० स्क्वे. फुटांचे घर मिळणार.

Bhagyashree Kamble

  • म्हाडा मोतीलाल नगर प्रकल्पात रहिवाशांना १६०० स्क्वे. फुटांचे आलिशान घर मिळणार.

  • गोरेगाव पश्चिमेत ३,७०० हून अधिक रहिवाशांची घराची प्रतीक्षा संपणार.

  • मुंबईत छोट्या घरांच्या किमती गगनाला भिडल्या असताना हा प्रकल्प रहिवाशांसाठी जॅकपॉट.

  • भविष्यातील घरांच्या भाड्यामुळे रहिवाशांना आणि एजंट्सनाही मोठा आर्थिक फायदा.

मुंबईत स्वतःचं घर असावं, असे प्रत्येक सामान्य व्यक्तीचं स्वप्न असतं. मात्र, गगनाला भिडलेल्या घरांच्या किमतीमुळे अनेकांचे हे स्वप्न अपूर्णच राहते. परंतु आता म्हाडा हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सज्ज झाली आहे. गोरेगाव पश्चिम येथील मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्प हीच त्याची सुरुवात आहे. या प्रकल्पाअंतर्गत रहिवाशांना तब्बल १६०० स्क्वेअर फुटांचे आलिशान घर मिळणार असून, हा प्रकल्प सध्या प्रचंड चर्चेत आहे.

गोरेगाव पश्चिमेतील मोतीलाल नगरमधील १, २ आणि ३ या चाळी आता जुन्या झाल्या आहेत. ३,७०० हून अधिक रहिवासी नवीन घराच्या प्रतिक्षेत आहेत. दरम्यान, म्हाडा या चाळींचे पुनर्विकास करणार आहे. म्हाडाच्या या प्रकल्पामुळे गैरव्यवहाराची शक्यता नाही. ठरलेल्या वेळेत रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घर मिळणार आहे.

मुंबईकरांसाठी जॅकपॉट

मुंबईत आज घर घेणं सोपं नाही. घरांची किंमती गगनाला भिडले आहेत. आज ३०० ते ३५० स्क्वे. फुटांचे घर विकत घेणेही सर्वसामान्यांसाठी सध्या स्वप्नवत आहे. त्यामुळे बरेच जण विरार, कल्याण डोंबिवली, बदलापूर, अबंरनाथ या भागांमध्ये अशा उपनगरांचा पर्याय निवडतात.

पण आता गोरेगावसारख्या प्राईम लोकेशनवर रहिवाशांना १६०० स्क्वे. फुटांचे नवे घर मिळणार आहे. यामुळे अनेकांचं आलिशान घरामध्ये राहण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. अलिकडेच वरळी बीडीडी पुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांना ५०० स्क्वे. फुटांचे घर मिळाले होते. दरम्यान, आता मोतीलाल नगरच्या प्रकल्पातील रहिवाशांना त्याच्या तिप्पट घर मिळणार आहे.

गोरेगावमधील एका अनुभवी रिअल इस्टेट एजंटनं सांगितलं की, 'पुढील ७ ते ८ वर्षांत या घरांना किमान दोन ते अडीच लाख रूपये प्रति महिने भाडं मिळू शकेल. यामुळे रहिवाशांना चांगलाच फायदा होईल. तसेच एजंटनाही या व्यवहारातून चांगलेच कमिशन मिळेल'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pakistan Cricket News : माजी क्रिकेटपटू शोएब मलिकचा तिसरा घटस्फोट होणार? व्हायरल व्हिडिओमुळे चर्चांना उधाण

‘नायक नहीं खलनायक है तू'; काँग्रेसचे नेते संजू बाबावर लय संतापले, काय आहे कारण?

Ganesh Naik Vs Eknath Shinde: ठाण्यात शिंदेसेना विरुद्ध भाजप, नाईक विरुद्ध शिंदे वाद लायकीवर?

Balasaheb Thackeray Death Controversy: बाळासाहेबांचा मृतदेह दोन दिवस का ठेवला? रामदास कदमांच्या विधानामुळे राजकीय खळबळ

Laxman Hake: मराठा नेते मनोज जरांगेंच्या मागण्यांवर लक्ष्मण हाके काय म्हणाले?

SCROLL FOR NEXT