MHADA Saam Digital
मुंबई/पुणे

MHADA Official Website : म्हाडाच्या बोगस वेबसाईटवरून अर्जदारांची फसवणूक; 6 लाखांचा गंडा

MHADA Fake Website : तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण म्हाडाची बनावट वेबसाईट बनवण्यात आलीय. या वेबसाईटवरून अर्जदाराची 6 लाखांची फसवणूक झालीय.

साम टिव्ही ब्युरो

भरत मोहोळकर, साम टीव्ही प्रतिनिधी

तुम्ही म्हाडाच्या घरासाठी अर्ज करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण म्हाडाची बनावट वेबसाईट बनवण्यात आलीय. या वेबसाईटवरून अर्जदाराची 6 लाखांची फसवणूक झालीय. ती नेमकी कशी? त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट.....

तुम्ही म्हाडाच्या घरासाठी ऑनलाईन अर्ज भरत असाल तर सावधान....! तुमची फसवणूक होऊ शकते. कारण सामान्यांच्या घरांची स्वप्नपूर्ती करणाऱ्या म्हाडाच्या वेबसाईटची हुबेहूब बनावट वेबसाईट तयार करण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आलीय. एवढंच नव्हे तर या बनावट वेबसाईवरून एका अर्जदाराची लाखो रुपयांना फसवणूक झाल्याचंही उघड झालंय.

दोन्ही वेबसाईट पाहा

Mhada.org

housing.mhada.gov.in

यामधील बोगस वेबसाईटच्या क्विक लिंकमध्ये पेमेंट ऑप्शन देण्यात आलाय. मात्र ओरिजनल वेबसाईटवर असा कुठलाही उल्लेख नाही.... ही वेबसाईट 30 जुलैपासून सुरु आहे. त्यात अनेकांची फसवणूक झालीय...या प्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल केल्याची माहिती म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

या बनावट वेबसाई बनवणा-यांनी 4 लोकांना गोरेगावमधील घर दाखवलं. या घराची किंमत 29 लाख रुपये असल्याचं सांगण्यात आली. तर घरासाठी रजिस्ट्रेशन फी 6 लाख रुपये भरण्यास सांगितलं. घराची पूर्ण किंमत भरल्यानंतर ताबा दिला जाईल, असंही सांगण्यात आलं. मात्र आपली फसवणूक झाली असल्याचं संबंधित व्यक्तीच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी म्हाडाकडे तक्रार केली. मात्र आता सायबर सेलने तातडीने याप्रकरणी ठकसेनाचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी. तसंच म्हाडाच्या आयटी सेल आणि ग्राहकांनीही सजग राहायला हवं...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: - अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण सुरू

Manifestation : मॅनिफेस्टेशन करणे म्हणजे काय ? जाणून घ्या

Shocking: बॉयफ्रेंडसोबत मिळवून नवऱ्याला मारलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनखाली गाडले; तिथेच जेवण बनवून जेवायची बायको

Shocking News : बॉलिंग केल्यानंतर पाणी प्यायला अन् जागीच कोसळला, क्रिकेटच्या मैदानावर खेळाडूचा मृत्यू

Voting Documents: या पुराव्यांशिवाय तुम्ही मदतान करू शकणार नाही! वाचा संपूर्ण यादी

SCROLL FOR NEXT