Pune Mhada Lottery  Saam TV
मुंबई/पुणे

MHADA Lottery: पुण्यात हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, वाकड अन् हिंजवडीत घ्या फक्त २८ लाखांत घर; कुठे अन् कसा कराल अर्ज?

Pune Mhada Lottery 2025: पुण्यामध्ये तुम्हाला हक्काचे घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी आहे. पुण्यातील वाकड आणि हिंजवडी परिसरात तुम्ही हक्काचे घर खरेदी करू शकणार आहेत. या घरांच्या किंमती फक्त २८ लाखांपर्यंत आहेत.

Priya More

Summary -

  • म्हाडा लॉटरी २०२५ अंतर्गत पुण्यात स्वस्त दरात घर खरेदीची संधी

  • पुण्यात स्वस्त किमतीत तुम्हाला हक्काचे घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी

  • हिंजवडी आणि वाकड परिसरात २ आणि ३ बीएचके घरं करा खरेदी

  • या घरांच्या किमती फक्त २८ लाखांपासून सुरू होतात

  • अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून शेवटची तारीख २० नोव्हेंबर २०२५ आहे

पुणेकरांसाठी गुड न्यूज आहे. पुणेकरांच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण होणार आहे. स्वस्तामध्ये घर खरेदी करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांना आता पुणे शहरामध्येच घर विकत घेता येणार आहे. कारण महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडाने मध्यवर्गीयांसाठी एक विशेष गृहयोजना जाहीर केली आहे. या योजनेअंतर्गत पुणेकरांना पुणे शहरात स्वस्त दरात घर खरेदी करता येणार आहे.

म्हाडाची ही घरं पुण्यातील वाकड आणि हिंजवडी परिसरात आहे. पुण्यातील आयटी हब म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिंजवडी आणि वाकड परिसरात अतिशय स्वस्त किमतीत तुम्हाला घर खरेदी करता येणार आहे. यश्विन अर्बो सेंट्रो या खासगी गृहनिर्माण प्रोजेक्टअंतर्गत ही घरे असणार आहेत. टू बीएचके आणि ३ बीएचके फ्लॅट्स तुम्हाला खरेदी करता येतील. या फ्लॅट्सचा एरिया ५०० ते ६०० स्क्वेअर फूट इतका असणार आहे.

महत्वाचे म्हणजे म्हाडाच्या या घरांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली असून २० नोब्हेंबर ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे. २० नोव्हेंबरला रात्री ११.५९ वाजेपर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. वाकड आणि हिंजवडीमधील या घरांच्या किमती अंदाजे ८० ते ९० लाखांच्या आसपास आहेत. पण म्हाडाच्या या योजनेअंतर्गत ही घरं तुम्हाला २८.४२ ते २८.७४ लाखांमध्ये मिळणार आहेत.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला म्हाडाची अधिकृत वेबसाईट https://lottery.mhada.gov.in ला भेट द्यावी लागेल. या वेबसाईटवर तुम्ही Pune Board Lottery 2025 यावर क्लिक करा. याठिकाणी तुम्हाला अर्ज दिसेल तो अर्ज तुम्ही व्यवस्थित भरा. आवश्यक ते सर्व कागदपत्र जोडा. ही अर्ज भरण्याची प्रक्रिया तुम्हाला २० नोव्हेंबरपर्यंत करता येणार आहे. आता फक्त १६ दिवस शिल्लक राहिले आहे त्यामुळे लवकर अर्ज करा.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dry Skin Care Tips: कोरड्या त्वचेवर लावा फक्त 'या' 3 गोष्टी, चेहरा उजळून निघेल

Ajit Pawar Death: आज ही शेवटची पहाट दादांना भेटायला यायची, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या ढसाढसा रडल्या; पाहा VIDEO

Panchang Today: जया एकादशीचा शुभ दिवस! विष्णू जपाचा लाभ आणि आजचे शुभ-अशुभ मुहूर्त

Plane Crash : खासगी विमानाचा भयंकर अपघात, १५ जणांचा मृत्यू, अपघातात संसदेचे सदस्य असल्याची माहिती

Ajit Pawar Funeral Baramati Live Updates : शरद पवार काटेवाडी येथे अजित पवारांच्या निवासस्थानी पोहचले

SCROLL FOR NEXT