Mhada Saam Tv
मुंबई/पुणे

Thane Mhada: म्हाडाकडून सामान्यांसाठी खुशखबर, ठाण्यात २ हजार घरांसाठी लॉटरी निघणार

MHADA housing scheme latest update: सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी म्हाडा ठाण्यात लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहेत. यात ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक घरांचा समावेश आहे.

Bhagyashree Kamble

सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी ठाण्यात म्हाडा लवकरच २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहेत. नुकतेच म्हाडाकडे कोकण मंडळाच्या २१४७ सदनिका आणि भूखंड विक्रीकरिता सुमारे २४, ९२२ अर्ज अनामत रकमेसह प्राप्त झाले होते. ही सोडत निघाली त्यात अनेकांचा हिरमोड झाला होता.

परंतु आता म्हाडाच्या कोकण मंडळाने पुन्हा नवीन घरांची योजना आखली आहे. त्यामुळे सामान्यांना नाराज होण्याची गरज नाही. कारण म्हाडा कोकण मंडळ सुमारे २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहेत.

कोकण मंडळाने पुन्हा नवीन घरांची योजना आखली आहे. येत्या काही महिन्यात म्हाडाचे कोकण मंडळ २ हजार घरांसाठी लॉटरी काढणार आहे. यात ठाण्यातील चितळसर येथील सर्वाधिक म्हणजेच ११७३ घरांचा समावेश असणार आहे.

गेल्या दीड वर्षात म्हाडा कोकण मंडळानं तीन सोडत काढल्या होत्या. ज्यात सुमारे १० हजार जणांचे घराचे स्वप्न पु्र्ण झाले होते. या वर्षीही सुमारे २ हजार घरांची सोडत काढण्याची तयारी कोकण मंडळाने दर्शवली आहे.

यात ठाण्यातील चितळसर येथे उभारलेल्या ११७३ घरांसह १५ टक्के गृहनिर्माण योजनेअंतर्गत आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत हाऊसिंग स्टॉकमधून म्हाडाला मिळालेल्या घरांचा समावेश असणार आहे. म्हाडानं चितळसर येथे २२ मजल्याच्या ७ इमारती तयार केल्या आहेत.

परंतु चितळसर या भागात पाणी आणि रस्त्याची समस्या आहे. ठाणे महानगरपालिकेनं अद्याप या इमारतीला ना हरकत प्रमाणपत्र दिलं नसल्यानं सोडतीचं काम रखडलंय. ना हरकत प्रमाणपत्र मिळताच येथील घरे सुद्धा लॉटरीमध्ये येतील. अशी माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उद्यापासून राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेला सुरुवात

Money Saving Tips : या 5 गोष्टी तुम्ही चुकूनही खरेदी करु नयेत

मुंबईत गोविंदाचा मृत्यू, तोल गेला अन् खाली कोसळला; सणाला गालबोट

Maharashtra Politics: महायुतीच्या दोन्ही दादांमध्ये जुंपली; सोन्याच्या चमचावरून अजितदादा अन् चंद्रकातदादांमध्ये जुगलबंदी

Maharashtra Politics : काँग्रेसला मोठा धक्का, ठाकरेंच्या पुत्राचा भाजपमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT