Mhada House file photo saam tv
मुंबई/पुणे

Mhada Konkan : म्हाडाच्या ७१ अनिवासी गाळ्यांचा ई लिलाव; नोंदणी अर्ज, बोली आणि निकाल कधी? वाचा सविस्तर

MHADA shops Virar Chitalsar auction October 14 : म्हाडाच्या कोकण मंडळानं ठाणे आणि पालघर या दोन जिल्ह्यांत ७१ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्याच्या ऑनलाइन नोंदणी अर्ज प्रक्रियेला सुरुवातही झालीय.

Saam Tv

  • म्हाडा कोकण मंडळाच्या ७१ अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई-लिलाव

  • विरार बोळींजमध्ये ४४, चितळसर मानपाडा प्रकल्पात २७ गाळे

  • नोंदणी व अर्ज प्रक्रिया या तारखेपासून सुरू होणार

  • बोली लागल्यानंतर एकत्रित निकाल या दिवशी होणार जाहीर

संजय गडदे, मुंबई | साम प्रतिनिधी

स्वस्तात मस्त गाळे खरेदी करण्यास इच्छुक असलेल्यांसाठी म्हाडा कोकण मंडळानं चांगली वार्ता दिली आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाकडून मुंबईजवळच्या ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील अनिवासी गाळ्यांच्या विक्रीसाठी ई लिलाव प्रक्रिया सुरू केली आहे. विरार बोळींज आणि चितळसर मानपाडा येथे गृहनिर्माण प्रकल्प परिसरात एकूण ७१ अनिवासी गाळे आहेत. त्यांची विक्री होणार असून, ई-लिलाव प्रक्रियाही सुरू झाली आहे.

गो-लाईव्ह कार्यक्रमांच्या अंतर्गत म्हाडाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल वानखडे यांच्या हस्ते या ऑनलाईन नोंदणी व अर्ज प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. या लिलावात विरार येथील ४४ तर चितळसर मानपाडा येथील २७ गाळे उपलब्ध आहेत.

१३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजल्यापासून पात्र अर्जदारांसाठी ऑनलाईन बोली प्रक्रिया सुरू होणार आहे. तसेच १४ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता याचा एकत्रित निकाल जाहीर केला जाणार आहे.

अर्जदारांनी काय करावं?

नोंदणी व अर्ज प्रक्रिया ११ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२५ दरम्यान सुरू राहणार असून, अर्जदारांनी या कालावधीत आवश्यक कागदपत्रे अपलोड करावीत. कागदपत्रांची पडताळणी २६ सप्टेंबर ते ३ ऑक्टोबर दरम्यान होईल, तर अनामत रक्कम भरण्याची मुदत ८ ते १० ऑक्टोबरपर्यंत ठेवण्यात आली आहे.

पात्रता निकष काय?

ई-लिलावात सहभागी होण्यासाठी अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे आणि २०१८ नंतरचे महाराष्ट्रातील अधिवास प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. विस्तृत पात्रता निकष, गाळ्यांचे विवरण, सामाजिक आरक्षण आणि अर्ज करण्याची कार्यपद्धती या संदर्भातील सविस्तर माहिती म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Fact Check : महिलांसाठी स्वतंत्र दारू दुकान? सरकारकडून महिलांना पिण्याची स्पेशल सोय?

मराठा विद्यार्थ्यांना SEBC चा फटका? MPSC निकालात कट ऑफ वाढला

Weather Update: राज्यात पुन्हा धुवाँधार पाऊस; हवामान विभागाचा २३ जिल्ह्यांना अलर्ट

Israel Attack On Qatar: इस्त्राईलने अमेरिकेला डिवचलं; मित्रदेशावर हल्ला केल्याने अमेरिकेचा संताप

Thackeray : ठाकरेसेना-मनसेची एकीची रणनीती? ठाकरेंच्या भेटीत काय ठरलं?

SCROLL FOR NEXT