MHADA NOTICE TO 4000 FAMILIES IN MUMBAI saam tv
मुंबई/पुणे

4 हजार कुटुंबांना म्हाडाची घर खाली करण्याची नोटीस; नेमकं कारण काय?

Mhada Issues Vacate Notices To 4000 Families In Mumbai: मुंबईतील संक्रमण शिबिरांमध्ये राहणाऱ्या सुमारे ४ हजार कुटुंबांना म्हाडाने घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. बायोमेट्रिक सर्वेक्षणाला अनुपस्थिती आणि आवश्यक कागदपत्रे सादर न केल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

Omkar Sonawane

मुंबईतील सुमारे ४ हजार कुटुंबांना म्हाडाने घर खाली करण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत. बायोमेट्रिक सर्वेक्षणादरम्यान अनुपस्थित राहणे आणि वास्तव्याशी संबंधित आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. जीर्ण किंवा कोसळलेल्या सेस इमारतींमधील मूळ रहिवाशांना तात्पुरत्या स्वरूपात राहण्यासाठी संक्रमण शिबिरांमध्ये घरे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. यामधील सुमारे २० हजार घरांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. प्रतीक्षा नगर, धारावी, मालवणी, मालाड, सहकार नगर (चेंबूर), कन्नमवार नगर, बिंबिसार नगर आणि गोराई या परिसरांतील संक्रमण शिबिरांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले.

सर्वेक्षणातून मिळालेल्या माहितीच्या आधारे रहिवाशांची पात्रता तपासली जात आहे. यामध्ये मूळ रहिवासी, कायदेशीररीत्या घराचा ताबा मिळवलेले रहिवासी आणि अनधिकृतपणे वास्तव्य करणारे रहिवासी अशा विविध श्रेणी तयार करण्यात येत आहेत. ही यादी तयार झाल्यानंतर म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.

अनुपस्थित रहिवाशांना पुन्हा संधी मिळणार

म्हाडाचे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश वाघ यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. सर्वेक्षणासाठी अधिकारी एखाद्या घरात गेले असता काही रहिवासी कामानिमित्त बाहेरगावी किंवा आपल्या गावी गेल्यामुळे उपलब्ध नव्हते. त्यामुळे त्यांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण होऊ शकले नाही. ज्या रहिवाशांना अद्याप नोटीस मिळालेली नाही आणि ज्यांचे सर्वेक्षण बाकी आहे, त्यांना बायोमेट्रिक सर्वेक्षणासाठी आणखी एक संधी दिली जाणार असल्याचे उमेश वाघ यांनी स्पष्ट केले.

संक्रमण शिबिरांमधील घरांची अनधिकृत विक्री, खरेदी आणि बेकायदेशीर ताब्याबाबत गेल्या काही वर्षांपासून तक्रारी येत होत्या. त्यामुळे पात्र रहिवाशांची ओळख पटवणे आणि अनधिकृत वास्तव्याला आळा घालणे, या उद्देशाने म्हाडाने बायोमेट्रिक सर्वेक्षण हाती घेतले आहे. आता सर्वेक्षणानंतर तयार होणाऱ्या पात्रता यादीकडे आणि पुढील कारवाईकडे संक्रमण शिबिरांतील रहिवाशांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Wednesday Horoscope: 'या' राशींच्या नशिबात आज आनंदाची बातमी! कोणाला आर्थिक लाभ, तर कोणाच्या आयुष्यात येणार नवी संधी?

Kanjivaram Silk Saree Designs: पारंपरिक लुकला द्या रॉयल टच! कांजीवरम सिल्क साडीचे ७ सुंदर ट्रेंडिंग डिझाईन्स

उत्तर प्रदेशात योगी पुन्हा CM नसणार? मुख्यमंत्रिपदाचा नवा चेहरा कोण? UP निवडणुकीआधी भाजपचा नवा डाव

Maharashtra News Live Update: कऱ्हामाईच्या महाआरतीतून नदी संवर्धनाचा जागर; अजितदादांच्या स्मृतींना भावपूर्ण अभिवादन!

Dagdusheth Ganpati VIDEO : बाकरवडी, मोदक, बेसनाचे लाडू अन् बरंच काही! दगडूशेठ बाप्पाला ४५१ पदार्थांचा नैवेद्य

SCROLL FOR NEXT