MHADA Homes Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Homes: म्हाडाच्या घरांची आता लॉटरीशिवाय विक्री! पण कुठे? वाचा का घेतला निर्णय

MHADA Home Without Lottery: म्हाडाचे घर घेण्यासाठी आता लॉटरीची गरज नाही. म्हाडाच्या ताडदेव परिसरातील घरांसाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.

Siddhi Hande

म्हाडाच्या घरांची लॉटरीशिवाय विक्री

ताडदेव भागातील घरांची होणार विक्री

म्हाडा प्राधिकारणाच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय

स्वतः चे घर घेण्याचे हजारो नागरिकांचे स्वप्न असते. मुंबईत घर घेण्याची संधी आता तुमच्याकडे आहे. आता तुम्हाला लॉटरीशिवाय म्हाडाची घरे घेता येणार आहेत. म्हाडाच्या ताडदेव परिसरातील घरे लॉटरीशिवाय आता विकली जाणार आहेत.

म्हाडाच्या ताडदेव येथील ज्या घरांची विक्री झालेली नाही ती घरे आता लॉटरीशिवाय विकण्यासाठी काढली आहे. सहा-सात कोटी रुपये किमतीच्या महागड्या घरांची लॉटरीशिवाय प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर विक्री केली जाणार आहे.त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्राधान्य मिळणार आहे.

ताडदेव परिसरातील या घरांचा दोन वेळा लॉटरीत समावेश केला होता. तरीही विक्री झाली नाही. त्यामुळे म्हाडाचे जवळपास ५०-५५ कोटी रुपये एकाच इमारतीतील घरांमुळे अडकलेले आहेत. त्यामुळे लॉटरीशिवाय या घरांची विक्री केली जाणार आहे. याबाबत म्हाडा प्राधिकरणाच्या मंजुरीनंतर अंतिम निर्णय होणार आहे.

राज्याच्या गृहनिर्माण धोरणातील तरतुदीनुसार गृह प्रकल्प राबवताना संबंधित विकासकांनी हाउसिंग स्टॉकच्या माध्यमातून म्हाडाला काही घरे देणे बंधनकारक आहे. त्यानुसार, ताडदेव येथील आठ घरे म्हाडाला देण्यात आली होती. या घरांसाठी म्हाडाने दोनदा लॉटरी काढली होती. मात्र, ही घरे विकली गेली नाहीत.

ताडदेव परिसरातील या घरांची विक्री झाली नाही. त्यानंतर ही घरे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निवासस्थान म्हणून देण्यासाठी म्हाडाने प्रयत्न केले मात्र, हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. त्यामुळे या घरांची प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य विक्री करावी लागणार असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

घरांसाठी ऑनलाइन अर्ज स्विकारणार

या घरांची संख्या कमी आहे. तसेच या घरांच्या किंमतीदेखील निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावर घरांची विक्री होणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करावे लागणार आहे. यासाठी लवकरच जाहिरात करावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ratnagiri Crime : वडिलांनी घेतलेल्या कर्जातून त्रस्त मुलाने जन्मदात्या आईचा घेतला जीव; रक्ताच्या थारोळ्यात आईला पाहून आत्महत्येचा प्रयत्न

Sambhajinagar: आधी पेट्रोल ओतलं नंतर पेटवून दिलं, माथेफिरूचा पेट्रोल पंपाला आग लावण्याचा प्रयत्न; VIDEO व्हायरल

Maharashtra Live News Update: ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना बायपास बॉर्डरवरच गेवराई पोलिसांनी रोखलं

Gold Silver Price : गणेश चतुर्थीआधी ग्राहकांच्या खिशाला मोठा फटका, सोनेचांदीचा भाव लाखाच्या पार

Ganesh Chaturthi 2025 : गणपती स्थापनेपासून विसर्जनापर्यंत पाळा हे नियम; मिळेल भरपूर लाभ

SCROLL FOR NEXT