MHADA Exam: पुन्हा एकदा तारखेत बदल- म्हाडा परीक्षा आता ३१ जानेवारीपासून ऑनलाईन Saam Tv
मुंबई/पुणे

MHADA Exam: पुन्हा एकदा तारखेत बदल- म्हाडा परीक्षा आता ३१ जानेवारीपासून ऑनलाईन

म्हाडाच्या भरती परीक्षेचे परत एकदा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: म्हाडाच्या (MHADA) भरती परीक्षेचे परत एकदा वेळापत्रकामध्ये बदल करण्यात आला आहे. ७ फेब्रुवारी पासुन सुरु होणा-या परिक्षा (Exam) आता ३१ जानेवापासून ऑनलाईन (Online) सुरु होणार आहे. ३१ जानेवारी, २, ३, ७, ८, ९ फेब्रुवारी या ६ दिवसामध्ये परीक्षा घेण्यात येणार आहे. ५६५ पदाकरिता ऑफलाईन होणारी परीक्षा आता ऑनलाईन होणार आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस (TCS) कंपनीवर सोपवण्यात आली आहे.

टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याअगोदर जीए सॉफ्टवेअर (GA software) कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी टाकण्यात आली होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचे उघडकीस आले आहे. यामुळे म्हाडाकडून ऐनवेळी ही परीक्षा रद्द करण्यात आली. यानंतर विविध परीक्षांचा अनुभव असलेल्या टीसीएस कंपनीमार्फत ही परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या परीक्षेचे तपशीलवार वेळापत्रक आणि इतर सूचना म्हाडाच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात येणार आहे.

हे देखील पहा-

ऑनलाईन परीक्षेचे प्रवेशपत्र (hall Ticket) डाऊनलोड करण्याकरिता म्हाडाच्या https.mhada.gov. in या संकेतस्थळावर २२ जानेवारी पासून https://cdn.digialm.com//EForms/configuredHtml/31659/75245/login.html या लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना (students) ऑनलाइन परीक्षा प्रक्रिया सोयीची ठरावी याकरिता म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळावर २६ जानेवारी पासून मॉक लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

https://g06.tcsion.com:443//OnlineAssessment/index.html?31659@@M211 या मॉक लिंकद्वारे (link) उमेदवारांना परीक्षेचे साधारण स्वरूप समजून घेता येणार असून ऑनलाईन परीक्षा कोणत्या पद्धतीने द्यावी याविषयी माहिती देण्यात आली आहे. म्हाडाची १२ डिसेंबरला होणारी परीक्षा आणि त्यानंतर होणारी परीक्षा पुढे ढकली आहे. राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाडांनी (Jitendra Awhad) मध्यरात्री ट्वीट (Tweet) करत ही परीक्षा पुढे ढकलली होती. विद्यार्थ्यांची क्षमा मागत त्यांनी ही माहिती दिली होती. याविषयी त्यांनी दिलगिरी व्यक्त करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला होता. म्हाडाची परीक्षा सकाळच्या सत्रात ५० हजार उमेदवार तर दुपारच्या सत्रात ५६ हजार उमेदवार परीक्षा देणार होते.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Local body Election : झेडपी, नगर पंचायतीच्या निवडणुका लांबणार? आज सुप्रीम कोर्टात फैसला होणार

Maharashtra Live News Update: येत्या ५ तारखेला राज्यातील सर्व शाळा बंद राहण्याची शक्यता

UPSC Success Story: ८ वेळा अपयश, नवव्या प्रयत्नात केली UPSC क्रॅक; स्वच्छता कर्मचाऱ्याचा लेक झाला सरकारी अधिकारी

Local Body Election : ताई की दादा, लाडकी बहीण कोणाची? लाडकीवरुन महायुतीतच लढाई

Todays Horoscope: या राशींनी आज कोणताही निर्णय घेताना पक्केपणा ठेवावा, वाचा राशीभविष्य

SCROLL FOR NEXT