TET Exam: 2019- 20 च्या TET परीक्षेत सर्वात मोठा घोटाळा उघडकीस

शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यावर एकापेक्षा एक खळबळजनक प्रकरण समोर येत आहेत.
TET Exam: 2019- 20 च्या TET परीक्षेत सर्वात मोठा घोटाळा उघडकीस
TET Exam: 2019- 20 च्या TET परीक्षेत सर्वात मोठा घोटाळा उघडकीस Saam TV News
Published On

पुणे: शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यावर एकापेक्षा एक खळबळजनक प्रकरण समोर येत आहेत. आता अशीच एक माहिती समोर आली आहे. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केले असल्याचे समोर आले आहे. पैसे घेऊन TET परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासामध्ये निष्पन्न झाले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याचे निष्पन्न झाले आहे.

हे देखील पहा-

२०१८ मधील परीक्षेमध्ये (exam) देखील मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरविले आहे. त्याची पडताळणी सुरू असल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना राज्य परीक्षा परिषदेकडून पोलिसांनी (police) मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी सायबर पोलिसांनी (Cyber ​​police) केली आहे. २०१९-२० च्या परीक्षेमध्ये एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र करण्यात आले आहे. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून बघितल्यावे त्यामध्ये तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र ठरल्याचे समोर आले आहे. तरी देखील त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे.

TET Exam: 2019- 20 च्या TET परीक्षेत सर्वात मोठा घोटाळा उघडकीस
"नोकरीवर घ्या नाही तर"...! औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांना धमकी देणाऱ्यावर गुन्हा दाखल

१३ फेब्रुवारी २०१३ नंतर सेवेमध्ये रुजू झालेल्या सर्व शिक्षकांच्या (teachers) प्रमाणपत्रांची (certificates) पडताळणी करण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले होते. राज्यात शिक्षण उपसंचालक, सर्व जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिकेच्या शिक्षण अधिकाऱ्यांना याविषयी सूचना करण्यात आले होते. जे शिक्षक प्रमाणपत्र सादर करणार नाही त्यांच्यावर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा स्थानिक शिक्षण अधिकाऱ्यांनी यावेळी दिला होता.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com