Pune Crime Saam Tv
मुंबई/पुणे

पुण्यात १२ लाखांचे ड्रग्ज जप्त; दहशतवादविरोधी पथकाची कारवाई

मुंबईहून पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात ही कारवाई करण्यात आली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पुणे : मुंबईहून पुण्यातील पुणे स्टेशन (Railway Station) परिसरात ही कारवाई करण्यात आली आहे. एका तस्करावर दहशतवाद विरोधी पथकाने ही कारवाई केली असून त्याच्याकडून १२ लाख रुपयांचे ११८ ग्रॅम एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे.

महंमद फारुख महंमद उमर टाक (वय- ४३) रा. म्हाडा कॉलनी, अंधेरी वेस्ट, मुंबई असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या ड्रग्ज तस्कराचे नाव आहे. याच्याकडून १२ लाख ८० हजार रुपयांचे ११८ ग्रॅम एम डी हा अंमली पदार्थ आढळून आला आहे. तसेच मोबाईल, डिजिटल वजन काटा, २ हजार ५९० रुपये रोख, आधारकार्ड, डेबीट कार्ड असे साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्याच्या दोन साथीदारांचा शोध सुरु आहे. (Pune Crime)

हे देखील पाहा-

याविषयी दहशतवाद विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशनच्या परिसरातील मालधक्का चौकाकडून पुणे स्टेशनकडे जाणार्‍या रोडवरील फुटपाथवर एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती मिळाली होती. यानुसार दहशतवाद विरोधी पथकाच्या पुणे युनिटने तेथे सापळा रचला होता.

पोलिसांना (Police) मिळालेल्या माहितीनुसार, पाठीला सॅक लावलेला एक तरुण फुटपाथवर संशयास्पद रेंगाळताना दिसून आला. तेव्हा साध्या वेशात पोलिसांनी महंमद टाक याला पकडले आहे. त्याची झडती घेतली असता त्यांच्याकडे ११८ ग्रॅम एम डी सापडले आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार अशोक फारुख पेरणेकर यांनी दहशतवाद विरोधी पथकाच्या मुंबई पोलीस ठाण्यात (Mumbai) फिर्याद दिली आहे. पोलीस निरीक्षक विश्वास भास्कर या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

VIDEO : अशी ही पळवापळवी! सरकारी अधिकाऱ्यांनी जप्त केलेले गॅस सिलिंडर जमावानं पळवले

Maharashtra Live News Update: पिंपरी-चिंचवड येथे रुपीनगरमधील गोदामाला आग; अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू

आधी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस – “हम जो फैसले करते हैं, खुलेआम करते हैं; काही तासांतच बेडरूममध्ये आढळला विवाहित महिलेचा मृतदेह

Maharashtra Politics: ...त्यानंतरच राहुरी पोटनिवडणूक लढवण्याबाबत निर्णय, प्राजक्त तनपुरेंच्या मनात नेमकं काय? फडणवीसांचंही केलं कौतुक

SCROLL FOR NEXT