Mumbai Local Megablock : पश्चमि रेल्वे मार्गावर आज रात्री ब्लॉक (Western Railway Megablock) घेण्यात येणार आहे. 23 आणि 24 जूनच्या मध्यरात्री हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉकमुळे लांबपल्ल्याच्या काही ट्रेनवर परिणाम होणार आहे. पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवर 23 जून रोजी रात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच 24 जूनच्या मध्यरात्री मेगाब्लॉक घेणार आहे. त्यामुळे या मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार नाही.
पश्चिम रेल्वेच्या वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान रात्रीचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक, सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड उपकरणांच्या देखभालीसाठी पश्चिम रेल्वेने शुक्रवार-शनिवारी रात्री मेगाब्लॉक घेतला आहे. त्यामुळे पश्चिम रेल्वेच्या काही रेल्वे गाड्याचा वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, वसई रोड आणि वैतरणा स्थानकांदरम्यान अप डाऊन जलद मार्गावर शुक्रवारी रात्री ११.५० ते मध्य रात्री ३.३० वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या मेगाब्लॉग कालावधीत ट्रेन क्रमांक १९१०१ विरार - भरूच मेमू विरारहून १५ मिनिटे उशिराने सुटणार आहे म्हणजे पहाटे ०४.३५ वाजता नियोजित सुटण्याऐवजी ४.५० वाजता सुटणार आहे. या मेगाब्लॉकमुळे मुंबईकडे येणाऱ्या आणि मुंबईतून बाहेर जाणाऱ्याला काही मेल- एक्स्प्रेस गाड्याच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.
तसेच रविवारी म्हणजे 25 जून 2023 रोजी पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय विभागात कोणताही ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे पश्चिम रेल्वेकडून सांगण्यात आले आहे. पश्चिम रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, प्रवाशांच्या सोयीसाठी आणि प्रवासाची मागणी पूर्ण करण्याच्या दृष्टीने पश्चिम रेल्वेने विशेष चार गाड्यांच्या मुदतीत वाढ केली आहे.
- रेल्वे क्रमांक 04712 वांद्रे टर्मिनस - बिकानेर साप्ताहिक विशेष जी पूर्वी 25 जून 2023 पर्यंत अधिसूचित करण्यात आली होती. ही रेल्वे 1 ऑक्टोबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
-रेल्वे क्रमांक 04711 बिकानेर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 24 जून 2023 या तारखेपर्यंत धावणार होती. पण आता या गाडीला 30 सप्टेंबर 2023 पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.
- रेल्वे क्रमांक 04714 वांद्रे टर्मिनस - बिकानेर साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 30 जून 2023 पर्यंत धावणार होती. पण आता 29 सप्टेंबर 2023 पर्यंत तिची मुदत वाढवण्यात आली आहे.
- रेल्वे क्रमांक 04713 बिकानेर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 29 जून 2023 पर्यंत धावणार होती. पण आता 28 सप्टेंबर 2023 पर्यंत तिची वाढवण्यात आली आहे.
- रेल्वे क्रमांक 09622 वांद्रे टर्मिनस - अजमेर साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 26 जून 2023 पर्यंत सुरु राहणार होती. पण आता या रेल्वेची फेरी 25 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढवण्यात आली आहे
- रेल्वे क्रमांक 09621 अजमेर – वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 25 जून 2023 पर्यंत धावणार होती. पण आता तिच्या फेरीत 24 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
- रेल्वे क्रमांक 09724 वांद्रे टर्मिनस - जयपूर साप्ताहिक स्पेशल जी यापूर्वी 29 जून 2023 पर्यंत सुरु राहणार होती. पण आता तिच्या फेरीत 28 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
- रेल्वे क्रमांक 09723 जयपूर - वांद्रे टर्मिनस साप्ताहिक विशेष जी यापूर्वी 28 जून 2023 पर्यंत धावणार होती. पण आता तिच्या फेरीमध्ये 27 सप्टेंबर 2023 पर्यंत वाढ करण्यात आली आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.