KDMC News Saam Tv
मुंबई/पुणे

KDMC News: कल्याण वाहतूक कोंडीतून होणार मुक्त, केडीएमसीच्या बैठकीत ठरला मेगाप्लान

Kalyan-Dombivli News: कल्याण रेल्वे स्टेशन परिसरासह संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीची वाढत चालली आहे. यावरच आता केडीएमसी आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी बैठक घेऊन तोडगा काढला आहे.

Satish Kengar

>> अभिजित देशमुख

Kalyan-Dombivli News:

राज्यात अनेक शहरात वाहतूक कोंडीची समस्या ही दिवसेंदिवस गंभीर होताना दिसत आहे. यातच कल्याण रेल्वे स्टेशन परिसरासह संपूर्ण शहरात वाहतूक कोंडीची वाढत चालली आहे. यावरच आता केडीएमसी आणि स्थानिक वाहतूक पोलिसांनी बैठक घेऊन तोडगा काढला आहे.

कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालय महापालिका आयुक्त इंदूराणी जाखड यांनी शहर वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. विजय राठोड, पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ, मध्य रेल्वेचे प्रादेशिक व्यवस्थापक, वाहतुक व्यवस्था, आरटीओचे प्रतिनिधीसोबत बैठक घेतली. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या बैठकीत स्टेशन परिसरात रिक्षा स्टँडच्या नियोजनासह शहरातील वाहतूक व्यवस्था सक्षम करण्यासाठी रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, वाहतूक शाखा, महापालिकेचे प्रतिनिधी यांचे संयुक्त पथक बनवून पार्किंग पी वन, पी टू रिक्षा स्टॅन्ड याबाबत धोरण ठरवण्यावर चर्चा झाली. जेणेकरून वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, अशा सूचना महापालिका आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांनी संबंधित अधिकारी वर्गास दिल्या आहेत. (Latest Marathi News)

या बैठकीत सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे जाळे सक्षम करणे, वाहतूक कोंडी कमी करणे, पार्किंग धोरण, सिग्नल यंत्रणा या विषयावर चर्चा करण्यात आली. यावेळी शहरातील सिग्नल यंत्रणा सुरळीतरित्या कार्यान्वित ठेवण्यासाठी महापालिका आणि पोलीस यंत्रणा यांनी आपसात समन्वय ठेवावा. जास्त प्रमाणात वाहतुक कोंडी होणाऱ्या ठिकाणी सिग्नलसाठी वेळेचे स्लॉट ठरवून द्यावेत, अशाही सूचना आयुक्त यांनी केल्या आहेत.

गर्दीच्या ठिकाणी मुख्यत: मार्केट परिसरात पे ॲन्ड पार्क योजना सुरू करावी, अशी सूचना ठाणे वाहतूक शाखेचे उपायुक्त डॉ.विजय राठोड यांनी केली आहे. पोलीस विभागाने यासाठी संबंधित परिसर निश्चित करुन द्यावा, जेणेकरुन वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही, असे आदेश महापालिका आयुक्त जाखड यांनी दिले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dance Viral Video: महिलांची कमाल! नऊवारी साडी नेसून महिलांनी धरला 'ही पोगरी असली' गाण्यावर ठेका;Video व्हायरल

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SCROLL FOR NEXT