Mumbai Local Train Mega Block Saam TV
मुंबई/पुणे

Mumbai Local Train : मुंबईकरांसाठी महत्वाची अपडेट; आज रेल्वेच्या 'या' मार्गावर मेगाब्लॉक, वाचा वेळापत्रक

Mumbai Local Train Mega Block : मुंबईकरांनो, रविवारी घराबाहेर पडण्याआधी लोकल ट्रेनचं वेळापत्रक नक्कीच वाचा, कारण रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे.

Satish Daud

मुंबई लोकल ट्रेनने प्रवास करण्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. आज रविवारी रेल्वेने तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घोषित केला आहे. ब्लॉकदरम्यान काही गाड्या उशिराने धावणार असून काही गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं, असं आवाहन करण्यात आलं आहे.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेवरील माटुंगा – ठाणे अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी ११.०५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. ब्लॉकदरम्यान, सीएसएमटीकडून सुटणाऱ्या आणि सीएसएमटी स्थानकाकडे येणाऱ्या सर्व गाड्या माटुंगा – ठाणेदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येईल.

हार्बर मार्गांवरील सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर रविवारी सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी, वडाळा रोड ते वाशी, बेलापूर पनवेल अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वे मार्गावरील बोरिवली-गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावर रविवारी सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. ब्लॉक कालावधीत बोरिवली – गोरेगाव अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील सर्व लोकल जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. तसेच काही लोकलसेवा रद्द करण्यात येणार आहेत.

दरम्यान, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट ते मरीन लाईन्स स्थानकांदरम्यान शनिवार मध्यरात्री १. १० ते पहाटे ४.१० वाजेपर्यत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीत शनिवार-रविवारी मध्य रात्री १२.१० वाजताची बोरिवली-चर्चगेट लोकल शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

तसेच रात्री ११.४९ वाजताची विरार-चर्चगेट लोकल लोकल, मध्य रात्री १२.३० बोरिवली-चर्चगेट लोकल आणि रात्री १२.०५ वाजताची विरार-चर्चगेट लोकल मुंबई सेंट्रल येथे शॉर्ट टर्मिनेट करण्यात येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ajit Pawar : अजित पवारांच्या विमानाचा स्फोट का झाला? ब्लॅक बॉक्स जळाला? रोहित पवारांनी थेट व्हिडिओ दाखवला

Maharashtra Live News Update: कागद जळाले नाही, ब्लॅकबॉक्स कसा जळाला? अजित पवारांच्या अपघातावरुन रोहित पवारांचे सवाल

अल्पसंख्याक शाळांच्या प्रमाणपत्राचा घोटाळा; रोहित पवारांनी जारी केलं घोटाळ्याचं रेटकार्ड

Ajit Pawar Death : पायलटचा वापर करुन अजितदादांचा घातपात? रोहित पवार नेमकं काय म्हणाले....

Pune Crime : भिगवण अपहरण प्रकरणात मोठा ट्विस्ट! पीडित तरुणी आरोपींच्या संपर्कात, नेमकं काय प्रकरण? वाचा

SCROLL FOR NEXT