Mega Block Mumbai x
मुंबई/पुणे

Mega Block : ऐन गणेशोत्सवात प्रवाशांचे हाल होणार, रविवारी मध्य-हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक; पाहा वेळापत्रक

Mega Block Mumbai : मध्य रेल्वे प्रशासनाने रविवार ३१ ऑगस्ट रोजी मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गांवर मेगा ब्लॉक राहणार असल्याची माहिती दिली आहे. यासंबंधित वेळापत्रक मध्य रेल्वेने प्रसारित केले आहे.

Yash Shirke

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने रविवारी (३१ ऑगस्ट) मध्य आणि हार्बर लाईनवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक राबवण्याचा निर्णय घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार आणि कुर्ला ते वाशी या दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे. प्रवाशांचे हाल होऊ नये यासाठी मध्य रेल्वेने वेळापत्रक जाहीर केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि विद्याविहार दरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर १०.५५ वाजेपासून ते दुपारी ०३.५५ वाजेपर्यंत मेगाब्लॉक राहील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून १०.४८ वाजता ते दुपारी ०३.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन धिम्या लोकल गाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते विद्याविहार दरम्यान डाऊन फास्ट लाईनवर वळविण्यात येतील. या गाड्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील व नंतर विद्याविहार येथे पुन्हा डाऊन धिम्या लाईनवर वळविण्यात येतील.

घाटकोपर स्थानकातून १०.१९ वाजेपासून दुपारी ०३.५२ वाजेपर्यंत सुटणाऱ्या अप धिम्या गाड्या विद्याविहार ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई दरम्यान अप फास्ट लाईनवर वळवण्यात येतील आणि या गाड्या कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांवर थांबतील.

कुर्ला ते वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन हार्बर लाईन सेवा ११.१० वाजेपासून दुपारी ०४.१० वाजेपर्यंत रद्द राहतील.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी १०.३४ वाजेपासून दुपारी ०३.३६ वाजेपर्यंत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर लाईन गाड्या आणि पनवेल/बेलापूर/वाशीहून सकाळी १०.१७ वाजेपासून दुपारी ०३.४७ वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईकडे येणाऱ्या अप हार्बर लाईन गाड्या रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – कुर्ला – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि पनवेल – वाशी – पनवेल या मार्गांवर विशेष उपनगरी गाड्या चालवण्यात येतील. हार्बर लाईन प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १०.०० वाजेपासून सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत ठाणे – वाशी/नेरुळ दरम्यान प्रवास करण्याची परवानगी असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

कल्याणच्या 'छमछम'वर छापा; बारबालांचे अश्लील नृत्य अन्... २८ जणांवर गुन्हा दाखल

440 व्होल्टचा धक्का! Bigg Boss 19च्या 'या' सदस्याला मिळाले 'तिकीट टू फिनाले'

हृदयद्रावक! ठाकरेंच्या शिवसेना उमेदवाराचा मृत्यू, प्रचाराच्या रणधुमाळीत आला हार्ट अटॅक

Maharashtra Live News Update : उद्धव ठाकरे संजय राऊतांच्या घरी जाणार, तब्येतीची विचारपूस करणार

NHM Bharti: आरोग्य विभागात नोकरीची संधी; १९४७ पदांसाठी भरती; अर्ज कुठे अन् कसा करावा?

SCROLL FOR NEXT