ऊस वाहतूकदारांची बैठक साखर आयुक्त बरोबर निष्फळ Saam Tv
मुंबई/पुणे

ऊस वाहतूकदारांची बैठक साखर आयुक्त बरोबर निष्फळ

तालुका तालुक्यात करणार ऊस वाहतूकदार आंदोलन

सागर आव्हाड, सामटीव्ही, पुणे

पुणे - गेल्या पाच ते सात वर्षात डिझेलचे Disel दर, ड्रायव्हरचा पगार, वाहनांच्या स्पेअर पार्टच्या Spare Parts किमती दुपटीने वाढल्या आहेत. अनेक मुकादम किंवा ऊसतोड कामगार करार करून पळून जातात हे मला देखील दिसत आहे. मात्र याबाबत साखर आयुक्त म्हणून मी काहीही करू शकत नाही. यासंदर्भात कारखान्यांना अथवा कारखानदारांना फक्त विनंती करू शकतो आदेश देऊ शकत नाही. ऊस वाहतूक संदर्भात कोणताच कायदा नसल्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड Shekhar Giakwad यांनी सांगितले.

हे देखील पहा -

जनशक्ती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी सदरची बैठक निष्फळ झाल्याचे सांगून तीव्र लढा करणार असल्याचे सांगितले. कारखानदारांना ऊस पुरवठा करणारे वाहन मालक यांच्यावर सतत अन्याय सुरू आहे. डिझेल, ड्रायव्हर व स्पेअर पार्टच्या किमती दुप्पट झाल्या तरी कारखानदारांकडून वाहतूक कमिशन मात्र वाढवले नाही म्हणून जनशक्ती संघटनेच्या वतीने ट्रॅक्टर आंदोलन करून ठिय्या मारण्यात आला होता.

यानंतर साखर आयुक्तांची बैठक बोलावू असे सांगण्यात आल्यानंतर आंदोलनाला स्थगिती देण्यात आली. दरम्यान साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्याशी जनशक्ती संघटना ट्रॅक्टर वाहतूक यांची बैठक संपन्न झाली. मात्र ही बैठक निष्फळ ठरल्याचे सांगण्यात आले. दरम्यान यावेळी जनशक्ती संघटना ट्रॅक्टर वाहतूक मालकांनी महाराष्ट्रातील सर्व आमदार खासदार व मंत्र्यांचा निषेध व्यक्त केला.

शिवाय महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांनी सांगितले. महाराष्ट्रातील सर्व बाबींसाठी कायदा आहे. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्यांसाठी कोणताच कायदा अस्तित्वात नाही ही आश्चर्याची बाब म्हणावी लागेल. गेल्या सात-आठ वर्षात अनेक ट्रॅक्टर मालक देशोधडीला लागले आहेत. अनेकांचे संसार उध्वस्त झाले आहेत. मग त्याला न्याय कधी मिळणार ? मंत्रिमंडळ या संदर्भात कायदा कधी आणणार ? हा आमचा सवाल असून आम्ही शांत राहणार नाही असे देखील ते म्हणले.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान द्या: सदाभाऊ खोत यांची मागणी

Shubman Gill: शुभमन गिलने इतिहास रचला, विराट कोहली आणि सर डॉन ब्रॅडमॅनचा रेकॉर्ड मोडला

Shocking : लव्ह मॅरेजनंतर ४ महिन्यांनी जवानाच्या पत्नीने आयुष्य संपवलं; इन्स्टाग्रामवर पोस्ट केला शेवटचा व्हिडिओ

Shocking : भांडणानंतर रागाच्या भरात बायको घर सोडून गेली, नंतर नवऱ्यानं आई आणि मुलांसह जे केलं ते पाहून सारेच हादरले

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

SCROLL FOR NEXT