Mumbai Mayor Saam tv
मुंबई/पुणे

Mayor Reservation: मोठी बातमी! 'या' दिवशी ठरणार तुमचा महापौर, राज्य सरकारकडून तारीख जाहीर

Mumbai mayor reservation draw date 2026: मुंबईसह २९ महानगर पालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत कधी जाहीर होणार या तारखेची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. २२ जानेवारीला सोडत जाहीर केली जाईल.

Nandkumar Joshi

मुंबईसह २९ महानगर पालिका निवडणुकांचा निकाल लागून ४ दिवस झाले तरी देखील अद्याप महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत जाहीर करण्यात आली नाही. सर्वांचे लक्ष महापौरपदाच्या निवडीकडे लागले आहे. अशातच महापौरपदाच्या आरक्षणाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. नगरविकास विभागाकडून यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.

राज्यातील २९ महानगर पालिकांच्या सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. या सर्व महानगर पालिकांच्या महापौरपदाच्या आरक्षणाची सोडत येत्या २२ जानेवारीला निघणार आहे. मंत्रालयातील परिषद सभागृहात सकाळी ११ वाजता ही प्रक्रिया पार पडेल. नगरविकास खात्याच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. या सोडतीवर राजकारणातील अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य अवलंबून असल्यामुळे अनेकांचे लक्ष याकडे लागले आहे.

मुंबई महानगर पालिकेच्या महापौर आरक्षणाच्या सोडतीमध्ये मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. आरक्षणाची जुनी रोटेशन पद्धत बदलून पुन्हा ओपन प्रवर्गापासून चक्राकार पद्धतीने नवी सुरूवात करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. समाजातील सगळ्याच घटकांना संधी मिळावी या हेतूने कायद्यात बदल करण्यात आल्याची चर्चा रंगली आहे. यामुळे अनेक इच्छुकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्याचसोबत राजकीय गणित देखील बदलणार आहे.

महापौरपदासाठी सोडतीतून आरक्षण निश्चित केले जाते. सर्वसाधारण पुरूष किंवा महिला, ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती अशा क्रमाने आरक्षण सोडत काढली जाते. आधी जर सर्वसाधारण गटासाठी महापौरपद असल्यास पुढच्या वेळी म्हणजे आता तो गट वगळून अन्य प्रवर्गाला आरक्षण दिले जाते. जेणेकरून सर्व गटांना सर्वोच्चपद भूषविण्याची संधी मिळेल. यावेळी मुंबईचे महापौरपद कोणाला मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Soaked figs: 1 महिना नियमित भिजवलेले अंजीर खाल्ल्यास शरीरात काय बदल होतात?

Maharashtra News Live Update: पिंपरी मार्केटमध्ये मोबाईल चोरीची घटना; चोराचा कारनामा कॅमेऱ्यात कैद

Bribe Case : जालन्यात खळबळ! अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहाथ पकडले; असे अडकले जाळ्यात

Kangana Ranaut: 'तू विद्यार्थी नाही, बेकार आहेस'; कंगना रणौतचा सौरव दासवर पलटवार

Rahul Gandhi: 'विद्यार्थी, इडियट आणि अंधभक्त...'; पेपर लीकप्रकरणावरून राहुल गांधींचा सरकारवर जोरदार हल्लाबोल

SCROLL FOR NEXT