Mumbai Mayor Kishori Pednekar Live Saam Tv
मुंबई/पुणे

Kishori Pednekar: मुंबई १००% अनलॉकच्या दिशेने, महापौरांचं सुचक वक्तव्य...

Kishori Pednekar On Mumbai Unlock: सध्या एकच इमारत मुंबईत बंद आहे, ८ दिवसात ती ही उघडेल, त्यामुळे अनलॉकच्या दिशेने आपण जात आहोत असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत.

सुमित सावंत, साम टीव्ही, मुंबई

मुंबई: मुंबईतील कोरोना (Corona) रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच मुंबईकरांसाठी आणखी एक चांगली बातमी आहे. मुंबईतील नागरिकांचं कोरोना लसीकरण येत्या आठवड्यात १००% पुर्ण होणार असल्याची माहिती मुंबईच्या (Mumbai) महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांनी दिली आहे. सोबतच फेब्रुवारी महिन्याच्या अखेरपर्यंत मुंबई १००% अनलॉक होणार असल्याचं सूचक वक्तव्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे. (Mayor Kishori Pednekar's suggestive statement towards Mumbai 100 percent unlock ...)

हे देखील पहा -

महापौर किशोरी पेडणेकर आपल्या पत्रकार परिषदेत म्हणाले की, येत्या आठवड्यात १००% लसीकरण पूर्ण होईल, १५ ते १८ वयोगटातील प्रतिसाद कमी आहे, पण होईल. फेब्रुवारीच्या शेवटपर्यंत अनलॉकमध्ये (Unlock) आम्ही जाऊ असं अतिरिक्त आयुक्त म्हणाले आहेत. लवकरच सगळं चालू होणं गरजेचं आहे. मास्क मात्र वापरावा लागेल, सॅनिटायझर वापरावं लागेल. सध्या एकच इमारत मुंबईत बंद आहे, ८ दिवसात ती ही उघडेल, त्यामुळे अनलॉकच्या दिशेने आपण जात आहोत असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या आहेत. त्याचप्रमाणे अनलॉकसाठी मुख्यमंत्री आणि पूर्ण टीम आग्रही आहे अशी माहितीही त्यांनी दिली आहे.

पंतप्रधानांच्या भाषणाबद्दल किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, देशाचे सर्वांचे लाडके पंतप्रधान यांच्या वक्तव्यावर मी बोलणार नाही. पण वास्तव असं आहे , चीनमधून कोरोना आला तेव्हा देशाच्या पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली आणि मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली काम केलं. मुख्यमंत्रीपेक्षा कुटुंब प्रमुख म्हणून मुख्यमंत्र्यांनी काळजी घेतली. भाजप किंवा काँग्रेस त्यांनी बघावं, महाराष्ट्रात जरी रेल्वे सुरू असली आणि केंद्राच्या अखत्यारीत ती असेल, तरी परप्रांतात जाणाऱ्या लोकांना व खाण्यापासून पिण्यापर्यंत महाराष्ट्राने बंदोबस्त केला, पण महाराष्ट्राबाहेर गेल्यावर त्यांच्या राज्यात त्यांचे हाल झाले होते आणि हे तिथे जाऊन लोक सांगत होते.

लता मंगेशकर यांच्या स्मारकाच्या वादाबद्दल किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, महापौर म्हणून मी त्यावर आता काही बोलणार नाही. पण किशोरी पेडणेकर म्हणून मला वाटतं, लता दिदींच्या किर्तीची उंची आपल्याला मोजता येणार नाही. त्या दैवी देणगी असलेल्या लता दीदींबद्दल भाजपने राजकारण करू नये. लतादीदींचा आवाज प्रत्येकाच्या हृदयात आहे, त्यांच्या नावाने भाजपने राजकारण करू नये. लता दीदींचे स्मारक मुंबईत, राज्यात , देशातच नाही, तर जगात ठिकठिकाणी व्हायला हवेत. कथाकथीत त्या आमदाराला कळायला हवं, लता दीदी रत्न आहेत . त्यांचं नाव घेऊन राजकारण करू नका असा टोला त्यांना भाजप आमदार राम करम यांना लगावला आहे.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dasara Melava: बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न पूर्ण होणार? दसरा मेळाव्यात राज-उद्धव एकत्र येणार?

TCS Layoffs: TCSमध्ये 30 हजार नोकरकपात? आयटी कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीचं सावट

Nilesh Ghaywal : खाकीचा खुळखुळा, गँगस्टर पळाला; निलेश घायवळला पळवणारे पुणे पोलिसांमध्ये कोण? VIDEO

Black Pepper : दररोज काळीमिरी खाल्ल्याने आरोग्याला होतात 'हे' भन्नाट फायदे

Anil Deshmukh : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील हल्ला खोटा? अहवालात नेमकं काय?

SCROLL FOR NEXT