Nawab Malik: 'नमस्ते ट्रम्प' च्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला - मलिकांचं मोदींना प्रत्युत्तर

Nawab Malik On Modi: नमस्ते ट्रम्पच्या प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे अशी घणाघाती टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.
'Namaste Trump' case spreads corona in the country - Nawab Malik's reply to PM Modi
'Namaste Trump' case spreads corona in the country - Nawab Malik's reply to PM ModiSaam TV

रश्मी पुराणिक, मुंबई

दिल्ली: देशात कोरोना (Corona) रुग्णसंख्या वाढण्याला कॉंग्रेस (Congress) जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी केली होती. तसेच कोरोना काळात महाराष्ट्रात राज्य सरकारने परप्रांतीय मजूरांना मोफत ट्रेन तिकीटं देऊन राज्याबाहेर काढलं असा गंभीर आरोपही पंतप्रधानांनी महाविकास आघाडी सरकारवर (Mahavikas Aghadi Government) केला होता. याबाबत आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर देत मोदींवरच हल्ला चढवला आहे. ('Namaste Trump' case spreads corona in the country - Nawab Malik's reply to PM Modi)

हे देखील पहा -

नवाब मलिक म्हणाले की, कोरोना काळात राज्यसरकार मजुरांसोबत, गरीबांसोबत उभे राहिले आणि तुम्ही विचार न करता लॉकडाऊन लादले. नमस्ते ट्रम्पच्या (Namastey Trump) प्रकरणामुळे देशात कोरोना पसरला ज्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची (PM Modi) आहे अशी घणाघाती टीका अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली आहे.

मलिक पुढे म्हणाले की, जेव्हा महाराष्ट्र सरकारने आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्याची मागणी केली होती, त्यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी कोरोना पसरणार नाही असे सांगितले होते. नमस्ते ट्रम्पच्या नावाखाली जगभरातून लोकांना अहमदाबादला बोलावण्यात आले, ट्रम्प यांना प्रोत्साहन दिले आणि तेथून देशभरात कोरोना पसरला असा थेट आरोपही नवाब मलिक यांनी केला आहे.

'Namaste Trump' case spreads corona in the country - Nawab Malik's reply to PM Modi
किरीट सोमय्या हल्ला प्रकरण: शिवसेनेच्या शहरप्रमुखांसह शिवसैनिक पोलीस ठाण्यात हजर

तसेच मजुरांसाठी तुम्ही ट्रेन चालवली आणि आम्ही तिकीट दिले, कारण तुम्हाला मजुरांकडून पैसे वसूल करायचे होते. मजूर चालत जात असताना आम्ही त्यांची सर्व व्यवस्था केली. जेवण दिले, पाणी दिले आणि जाण्यासाठी तिकिटे दिली. तुम्ही फुकट ट्रेन चालवली नाही. पहिल्यांदा उत्तरप्रदेश (Uttar Pradesh) व बिहारचे (Bihar) मजुर चालत निघाले होते. शेवटी आम्ही राज्य सरकारच्या परिवहन बसेसही चालवल्या परंतु तुम्ही कोणताही विचार न करता लॉकडाऊन लावून लोकांना थाळया वाजवायला लावल्या त्याचा परिणाम लोकं भोगत आहेत असेही नवाब मलिक म्हणाले आहेत. मोदींच्या या वक्तव्याचा महाविकास आघाडी सरकारने निषेध केला आहे.

Edited By - Akshay Baisane

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Saam Marathi News
saamtv.esakal.com