नियम पाळा, सुरू केलं ते बंद करण्याची वेळ आणू नका; मुंबईच्या महापौरांचा इशारा !
नियम पाळा, सुरू केलं ते बंद करण्याची वेळ आणू नका; मुंबईच्या महापौरांचा इशारा ! SaamTV
मुंबई/पुणे

नियम पाळा, सुरू केलं ते बंद करण्याची वेळ आणू नका; मुंबईच्या महापौरांचा इशारा !

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सुशांत सावंत -

मुंबई : 2020 ची दिवाळी Diwali वाईट प्रकारे गेली आहे. आताची दिवाळी दुकानदार, ग्राहक कर्मचारी यांना दिलासा देणारी बातमी आहे. अर्थकारण थांबलं होतं मात्र आता ती थांबलेली चेन उघडत आहे. आजही कोरोना Corona संपलेला नाही. कमी झाला आहे. काळजी घ्यावी लागेल. ज्यांचे लसीकरण झाले नाही त्यांनी करून घ्यावे, मास्क लावणे गरजेचे आहे. दोन्ही डोस झाले असले तरी मास्क लावणं आवश्यक आहे अशी त्रिसुत्रीच महापौर किशोरी पेडणेकरांनी सांगितली. (Mayor Kishori Pednekar explained the rules for protection from corona)

हे देखील पहा -

दिलेले नियम सर्वांनी फॉलो करा. जे सुरू केलं ते बंद करण्याची वेळ येऊ देवू नका असा इशाराही महापौरांनी दिला आहे. केंद्र, राज्य, पालिका, पोलीस आणि नागरिकांनी कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न केले. आपण एका पायरीवर पोहोचलो आहोत तसेच जमेल तेवढे सोशल डिस्टन ठेवायला हवं तसंच रात्री 12 वाजेपर्यंत हॉटेल्स Hotes सुरू करावी अशी मागणी हॉटेल व्यावसायिकांची होती. नवरात्रीमध्ये Navratri देवळे उघडली गेली म्हणून बऱ्याच जणांना आनंद झाला आहे. ज्यांनी दोन डोस घेतले त्यांना आपण लोकलची परवानगी आधी दिली असल्याच त्या म्हणाल्या.

तसेच पक्षाच्या वाढीसाठी काय हितकारक आहे यावर आज चर्चा झाली आहे पक्षवाढीसाठी छोट्याछोट्या गोष्टीकडे लक्ष देणे आवश्यक असून अशा बैठका आदित्य ठाकरे नेहमीच घेतात असही महापौर म्हणाल्या. तसेच टास्क फोर्सची Task Force जी टीम आहे ती सकारात्मक बघत आहे तिसरी लाट आपण रोखू शकलो तर सर्व थिएटरच्या क्षमतेचा देखील विचार होईल आपण डेंग्युचे अड्डे उध्वस्त करत आहोत जर प्रत्येकाने लक्ष दिले तर डेंग्यूची निर्मिती नष्ट होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

Edited By - Jagdish Patil

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

MPSC Exam : लोकसेवा आयोगाकडून सुधारित वेळापत्रक; राज्यसेवा पूर्व परीक्षेची नवीन तारीख जाहीर

Arvind Kejriwal: अरविंद केजरीवाल यांच्या जामीन अर्जावर कधी येणार निर्णय? सर्वोच्च न्यायालयाने सांगितली तारीख

Maharashtra Politics 2024 : लोकसभेनंतर 'काँग्रेसी' एकत्र येणार?; प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?

Kolhapur Lok Sabha: कोल्हापूर लोकसभेचं मैदान कोण मारणार? वाढलेल्या टक्केवारीचा फायदा शाहू महाराजांना मिळणार की संजय मंडलिक यांना?

SRH vs LSG, IPL 2024: लखनऊच्या नवाबांना हैदराबादी दणका! हेडने घातला विजयाचा 'अभिषेक'; मुंबई स्पर्धेतून बाहेर

SCROLL FOR NEXT