मावळ तालुका खरेदी-विक्री सहकारी संघाची निवडणूक (maval taluka kharedi vikri sangh election) राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप व शिवसेना अशी महायुतीच्या माध्यमातून लढवली जात आहे. निवडणुकीआधीच महायुतीच्या दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित नऊ जागांसाठी वीस उमेदवार रिंगणात आहेत. (Maharashtra News)
खरेदी विक्री संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून एकूण 19 जागांपैकी अ वर्गातील पाच जागा बिनविरोध झाल्या आहेत. ब वर्गातील दोन महिला प्रतिनिधी दोन भटक्या विमुक्त जाती गटातील एक अशा एकूण दहा जागा बिनविरोध झाल्या आहेत.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
उर्वरित नऊ जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी, भाजप व शिवसेना महायुतीच्या वतीने महायुती सहकार पॅनलच्या माध्यमातून निवडणूक जिंकण्याचा निर्धार केला आहे. काँग्रेसने क वर्ग इतर मागास प्रवर्ग गटात उमेदवार दिले आहेत.
काँग्रेसने दिलेल्या उमेदवारांपैकी सर्वच उमेदवार हे निवडून येतील असा विश्वास देखील काँग्रेसच्या पॅनलने केला आहे. रविवारी होणाऱ्या या मतदान प्रक्रियेनंतर मावळ तालुका खरेदी विक्री संघा संघावर कोण बाजी मारणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.