Matheran Saam TV
मुंबई/पुणे

आजपासून 'माथेरानची राणी' पावसाळी सुट्टीवर, ४ महिने मिनी ट्रेन घेणार विश्रांती; अमन लॉज-माथेरान शटल सेवा राहणार सुरू

Matheran Toy Train : माथेरानची प्रसिद्ध मिनी ट्रेन १५ जूनपासून १५ ऑक्टोबरपर्यंत पावसाळी सुट्टीवर जाणार आहे. नेरळ-माथेरान सेवा बंद राहणार असली तरी अमन लॉज ते माथेरान शटल सेवा सुरू राहणार आहे.

Namdeo Kumbhar

Matheran Shuttle Service: पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेली नेरळ–माथेरान मिनी ट्रेन सेवा आजपासून (१५ जून) मान्सून सुट्टीवर जात आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने याबाबतचे आदेश जारी केले असून, १५ जून ते १५ ऑक्टोबर २०२६ या चार महिन्यांच्या कालावधीत नेरळ ते अमन लॉज दरम्यानची नियमित प्रवासी सेवा बंद राहणार आहे. मात्र, अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा नेहमीप्रमाणे सुरू राहणार असल्याने पावसाळ्यातही पर्यटकांना माथेरानच्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेता येणार आहे.

नेरळ ते माथेरान हा रेल्वे मार्ग सुमारे २१ किलोमीटरचा घाटमार्ग असून, या मार्गावर अनेक डोंगरकडे, खोल दऱ्या आणि संवेदनशील उतार आहेत. पावसाळ्यात मुसळधार पावसामुळे दरडी कोसळणे, झाडे पडणे किंवा रेल्वे मार्गावर माती वाहून येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य देत दरवर्षी मान्सून काळात ही सेवा सुरक्षिततेचा उपाय म्हणून बंद ठेवली जाते.

माथेरान-अमन लॉज - माथेरान शटल सेवा वेळापत्रक

(अ) माथेरान - अमन लॉज शटल सेवा (दररोज)

१. 52154 माथेरान प्रस्थान ०८.२० वा.; अमन लॉज आगमन ०८.३८ वा.

२. 52156 माथेरान प्रस्थान ०९.१० वा.; अमन लॉज आगमन ०९.२८ वा.

३. 52158 माथेरान प्रस्थान ११.३५ वा.; अमन लॉज आगमन ११.५३ वा.

४. 52160 माथेरान प्रस्थान १४.०० वा.; अमन लॉज आगमन १४.१८ वा.

५. 52162 माथेरान प्रस्थान १५.१५ वा.; अमन लॉज आगमन १५.३३ वा.

६. 52164 माथेरान प्रस्थान १७.२० वा.; अमन लॉज आगमन १७.३८ वा.

(शनिवार/रविवार)

७. स्पेशल-2 माथेरान प्रस्थान १०.०५ वा.; अमन लॉज आगमन १०.२३ वा.

८. स्पेशल-4 माथेरान प्रस्थान १३.१० वा.; अमन लॉज आगमन १३.२८ वा.

(ब) अमन लॉज - माथेरान शटल सेवा (दररोज)

१. 52153 अमन लॉज प्रस्थान ०८.४५ वा.; माथेरान आगमन ०९.०३ वा.

२. 52155 अमन लॉज प्रस्थान ०९.३५ वाजता; माथेरान आगमन ०९.५३ वाजता

३. 52157 अमन लॉज प्रस्थान १२.०० वाजता; माथेरान आगमन १२.१८ वाजता

४. 52159 अमन लॉज प्रस्थान १४.२५ वाजता; माथेरान आगमन १४.४३ वाजता

५. 52161 अमन लॉज प्रस्थान १५.४० वाजता; माथेरान आगमन १५.५८ वाजता

६. 52163 अमन लॉज प्रस्थान १७.४५ वाजता; माथेरान आगमन १८.०३ वाजता

(शनिवार/रविवार)

७. स्पेशल-1 अमन लॉज प्रस्थान १०.३० वाजता; माथेरान आगमन १०.४८ वाजता

८. स्पेशल-3 अमन लॉज प्रस्थान १३.३५ वाजता; माथेरान आगमन १३.५३ वाजता

यंदा मान्सूनचे आगमन काहीसे लांबले असले, तरी मध्य रेल्वेने नियमानुसार १५ जूनपासून नेरळ-माथेरान मिनी ट्रेन बंद ठेवण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. त्यामुळे आज सोमवारपासून नेरळ स्थानकातून माथेरानकडे जाणारी नियमित मिनी ट्रेन धावणार नाही.

मात्र, पर्यटकांची गैरसोय टाळण्यासाठी अमन लॉज ते माथेरान दरम्यानची शटल सेवा अविरत सुरू राहणार आहे. या सेवेमुळे माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांना पावसाळ्यातील धुक्याची चादर, हिरवाईने नटलेला निसर्ग आणि नयनरम्य वातावरणाचा आनंद घेता येईल.

रेल्वे प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार ही शटल सेवा नियमितपणे धावणार असून, पर्यटकांनी प्रवासापूर्वी रेल्वेच्या अधिकृत वेळापत्रकाची माहिती घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: छत्रपती संभाजीनगर जिल्हा कोरडा दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची मागणी

Kangana Ranaut: महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या चारित्र्याचीच चर्चा का? कंगना रणौतचा थेट सवाल

Blackhead Removal Home Remedies: ब्लॅकहेड्समुळे चेहरा दिसतोय खराब? 'हे' ५ उपाय करा; मिळेल नॅचरल सॉफ्ट फेस

National Film Awards : ७२ वर्षांचा इतिहास बदलला; राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा दिल्लीऐवजी गुजरातमध्ये होणार

Tuesday Horoscope: कामाच्या ठिकाणी ताण वाढेल, ७ राशींचा खर्च कमी होणार; वाचा उद्याचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT