Eastern Express Highway  Saam tv
मुंबई/पुणे

Eastern Express Highway : मध्य रेल्वेच्या महामेगाब्लॉकचा फटका; ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर प्रचंड वाहतूक कोंडी, प्रवाशांचा खोळंबा

Eastern Express Highway Traffic Jam: मध्य रेल्वेवरील ६३ तासांच्या मेगाब्लॉकमुळे ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईच्या दिशेने कामाला जाणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा फटका बसत आहे.

Vishal Gangurde

मयूर राणे, साम टीव्ही प्रतिनिधी

मुंबई : मध्य रेल्वेवरील जम्बोब्लॉकच्या पार्श्वभूमीवर ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळत आहे. ठाण्याच्या दिशेहून मुंबईकडे निघालेल्या वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मध्य रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे ठाणे, मुलुंड ते कांजूरदरम्यान वाहनांच्या लांबच लांबा लागलेल्या दिसून येत आहेत.

मध्य रेल्वेवरील ६३ तासांच्या मेगाब्लॉकमुळे ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. मुंबईच्या दिशेने कामाला जाणाऱ्या वाहनधारक आणि प्रवाशांना मोठा फटका बसताना दिसत आहे. रेल्वेच्या मेगाब्लॉकमुळे ईस्टर्न एक्स्प्रेस मार्गावरील मुलुंड ते कांजूरच्या दरम्यान लांबच लांब रांगा लागल्या आहेत. यामुळे वाहतूक कोंडीचा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहेत.

एरोली लिंक रोडवर अपघातामुळे प्रचंड वाहतूक कोंडी

एरोलीमधील लिंक रोडवर कंटेनर उलटल्याने वाहतूक कोंडी झाली आहे. लिंक रोडवरील ही वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केले जात आहेत. उलटलेला कंटेनर हा रस्त्याच्या बाजूला काढण्यात आलेला आहे.

उलटेलला कंटेनर रस्त्यावरून इतर ठिकाणी हलविण्याचे प्रयत्न वाहतूक पोलिसांकडून केले जात असल्याचे पाहायला मिळत आहे. या अपघातामुळे ठाण्याच्या दिशेला जाणारी वाहतूक प्रभावित झाली आहे. ईस्टर्न एक्स्प्रेस वेवर मुंबईहून ठाणे आणि नवी मुंबईकडेही जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांबा रांगा लागल्या आहेत.

मुलंड, ठाणे, दिवा मार्गावर 50 गाड्या राखीव

रेल्वेने मेगाब्लॉकसंदर्भात कळल्यानंतर आम्ही 50 गाड्या राखीव ठेवल्या आहेत. मुलुंड, ठाणे आणि दिवा या मार्गावर जास्त गाड्या चालवण्यास रेल्वेने सांगितलं आहे. मुलुंड, ठाणे आणि दिवा इथे गर्दी होतेय की नाही, यावर लक्ष ठेवून आहोत. सगळीकडे परिस्थिती नियंत्रणात असून प्रवाशांची गर्दी अद्याप वाढलेली नाही. आजच्या दिवसावरून उद्याचं नियोजन करणार आहोत, असं ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाने वाहतूक निरीक्षक भगवान गायकवाड यांनी सांगितलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS, Playing XI: रोहितचा पर्याय सापडला! पर्थ कसोटीसाठी टीम इंडिया या 11 खेळाडूंसह उतरणार मैदानात

Nashik News : मोठी बातमी! नाशिकमध्ये ५ कोटींचं घबाड सापडलं, नेत्यासह गाडीही ताब्यात

Maharashtra News Live Updates: पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Night Skin Care: झोपण्यापूर्वी चेहऱ्याला लावा किचनमधील 'या' गोष्टी; सकाळी मोत्याप्रमाणे चमकेल चेहरा

Rajesh Pawar News : भाजप आमदाराची सभा गावकऱ्यांनी उधळली! राजेश पवार यांच्या सभेत गोंधळ | VIDEO

SCROLL FOR NEXT