Mumbai Fire Saam tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईत इमारतीत भाषण आग; वृद्ध महिलेचा मृत्यू, परिसरातील नागरिकांची धावाधाव

Mumbai Fire update :मुंबईत इमारतीत भाषण आग लागली आहे. आगीनंतर परिसरातील नागरिकांची धावाधाव लागली आहे.

Vishal Gangurde

दहिसरच्या शांतीनगर एस.आर.ए. इमारतीत अचानक भीषण आग

७५ वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू

अग्निशमन दलाने युद्धपातळीवर बचावकार्य सुरू

आगीचे कारण अद्याप अस्पष्ट

संजय गडदे, साम टीव्ही

मुंबईच्या दहिसर परिसरातील शांतीनगर जनकल्याण एस.आर.ए. इमारत आज रविवारी अचानक लागलेल्या भीषण आगीमुळे हादरली. इमारतीच्या आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, या घटनेनंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला.

इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली. युद्धपातळीवर बचावकार्य सुरू आहे. आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने परिसर सील करून सुरक्षेची काळजी घेतली आहे.

या आगीत उपचारादरम्यान पंच्याहत्तर वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. तसेच तीन जण जखमी झाले आहेत. त्यामध्ये एक इसम गंभीर आहे. विशेष म्हणजे, १२ वर्षीय मुलगी पूर्णपणे भाजलेली आहेत. या मुलीवर उपचार सुरू आहेत. आणखी दोन जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत.

स्थानिकांच्या माहितीनुसार, आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळातच धुराचे लोट परिसरभर पसरले. त्यामुळे शेजारील इमारतीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या अग्निशमन दलाचे जवान आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. तर प्रशासनाकडून आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

मुंबईतील एस.आर.ए. इमारतींमध्ये नेहमीच विजेच्या तारा, गॅस सिलिंडर किंवा शॉर्टसर्किट यासारख्या कारणांनी आग लागण्याचे प्रकार घडत असतात. गेल्या काही वर्षांपासून आग लागण्याचा घटना वाढल्याचंही सांगण्यात येत आहे. त्यामुळे अग्निसुरक्षेच्या उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह उभे झालं आहे. मुंबईतील कित्येक इमारतींमध्ये किती फायर सेफ्टी नियमांचे पालन केले जाते, हे तपासणे आवश्यक झालं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

माय-लेकीची निर्घृण हत्या,जवळच्या व्यक्तीनेच दगा दिला; ११ दिवसांनी उलगडलं हत्येचे गूढ

Maharashtra Live News Update: कोल्हापुरात भरदिवसा चाकू हल्ल्याचा थरार

Saree Draping Style: लग्नसराईसाठी साडी ड्रेपिंगच्या नविन आयडिया शोधताय? मग या पद्धतीने साडी नक्की नेसून मिळेल ग्लॅमरस लूक

Big Boss फेम अन् टीव्ही अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, लालभडक लेहेंग्यातील Photo व्हायरल

Maharashtra Politics: भाजपचे मनसुबे हाणून पाडा, उद्धव ठाकरेंच्या कामगारसेनेच्या पदाधिकाऱ्यांना सूचना|VIDEO

SCROLL FOR NEXT