Andheri West Fire Accident  Saam Tv
मुंबई/पुणे

Andheri News : अंधेरी पश्चिम स्टेशन परिसरात भीषण आग; चार ते पाच दुकानं जळून खाक

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने मोठा भडका घेतला.

साम टिव्ही ब्युरो

Andheri West Fire Accident : मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात आज सकाळच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात या आगीने मोठा भडका घेतला. बघता-बघता आगीत तीन ते चार दुकाने जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. (Latest Marathi News)

सुदैवाने या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत चार ते पाच दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. याशिवाय अंधेरी (Andheri) रेल्वे हद्दीतील काही भाग सुद्धा जळून खाक झाला आहे. प्राप्त माहितीनुसार, आज म्हणजे शुक्रवारी सकाळी साडेपाच वाजेच्या सुमारासअंधेरी पश्चिमेकडील स्टेशन परिसरात असलेल्या दुकानांना अचानक आग लागली.

बघता-बघता या आगीने रौद्ररूप धारण केलं. अचानक आग लागताच स्टेशन परिसरात मोठा गोंधळ निर्माण झाला. आगीची माहिती अग्निशमन विभागाला देण्यात आली. माहिती मिळताच, अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. या आगीत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, आगीत पाच दुकानं जळून खाक झाली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथामिक माहिती आहे. या संदर्भात संदर्भात डी.एन.नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास पोलीस करीत आहेत.

Edited By - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain Live News : पुण्यातील मुळशीमध्ये रेकॉर्ड ब्रेक पाऊस

Governement Decision: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! कापसावरील ११% आयात शुल्क माफ; सरकारचा मोठा निर्णय

Crime : रस्त्यावर भीक मागणाऱ्या मुलीवर सामूहिक बलात्कार, दारू प्यायले अन्...

Viral Video: दुचाकी पार्किंगवरून पेटला वाद, तरूण आणि पोलिसांमध्ये हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

Wardha : मुखाग्नी देताच स्मशानभूमीत घडले भयंकर; नातेवाईकांची उडाली धावपळ

SCROLL FOR NEXT