Saam TV Breaking News Saam TV Breaking News
मुंबई/पुणे

Mumbai Fire : मुंबईत पॉश एरियात आगीचा भडका, २२ मजली इमारतीत भीषण आग

Mumbai Fire News : मुंबईतील अंधेरी लोखंडवाला परिसरातील २२ मजली इमारतीत भीषण आग लागली. अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू. जीवितहानीबाबत अद्याप माहिती नाही.

Namdeo Kumbhar

संजय गडदे, मुंबई प्रतिनिधी

Mumbai fire incidents latest updates : मुंबईतील अलिशान परिसरातील एका २२ मजली इमारातीच्या नवव्या मजल्याला भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. मंगळवारी रात्री पावनेनऊ वाजताच्या आसपास आगीची घटना घडली. अंधेरीत पॉश एरिया असलेल्या लोखंडवालामध्ये रात्रीच्या वेळी ही दुर्घटना घडली. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. या दुर्घटनेत अद्याप जिवीतहानी झाल्याचे कोणतेही वृत्त नाही. आगीवर निंयत्रण मिळवण्याचे काम सुरू असल्याची माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे.

अंधेरीत उंच इमारतीत भीषण आग; अग्निशमन दलाची धाव

अंधेरी (पश्चिम) येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्स परिसरातील उंच इमारतीत मंगळवारी रात्री आग लागल्याची घटना घडली. लोखंडवाला येथील जॉगर्स पार्कजवळ असलेल्या मेघदूत बिल्डिंग, बी विंग या इमारतीच्या नवव्या मजल्यावर आगीची दुर्घटना घडली. मुंबई अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाला रात्री सुमारे ८:४४ वाजता या आगीची माहिती मिळाली. ही इमारत भुईमजला अधिक २२ मजली असून नवव्या मजल्यावर आग लागल्याचे समोर आले.

आग कशामुळे लागली?

माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांच्यासोबत पोलीस, रुग्णवाहिका सेवा तसेच संबंधित विभागाचे कर्मचारीही घटनास्थळी पोहोचले. सुरक्षेच्या दृष्टीने वीज पुरवठा विभागाच्या पथकालाही सतर्क करण्यात आले होते. अग्निशमन दलाने तत्काळ आग नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. त्याशिवाय आगीचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

SRH vs DC: अभिषेक शर्माच्या शतकाच्या मदतीनं हैदराबादने दिल्लीला दिली मात,SRHच्या विजयानंतर Points Table मध्ये मोठी उलथापालथ

Shocking : दुसऱ्या जातीची सून नको! संतापलेल्या चुलत्याचा पुतण्यावर जीवघेणा हल्ला

तरुणीला लॉजवर बोलवलं, अश्लील मेसेज पाठवले; जावेदला मुलीनं दाखवला हिसका, कल्याणमध्ये नेमकं झालं काय?

बारामती पोटनिवडणुकीत पवार कुटुंब एकत्र, सुनेत्रा पवारांच्या सांगता सभेला सुळेंची हजेरी

भाऊ-भाऊ म्हणतात आणि पाय खेचतात, नितीन गडकरींचा निशाणा कोणावर?|Video Viral

SCROLL FOR NEXT