Cricket Ball Weight: तुम्हाला माहितीये का क्रिकेट बॉलचं वजन काय असतं?

Surabhi Jayashree Jagdish

क्रिकेट

क्रिकेट हा भारतासह जगभरात अत्यंत लोकप्रिय खेळ मानला जातो. या खेळात वापरल्या जाणाऱ्या चेंडूचे वजन खेळाच्या फॉरमॅटनुसार ठरवले जाते. हे सर्व नियम आयसीसीच्या अधिकृत नियमानुसार निश्चित केलेले असतात.

ICC Cricket Rules

चेंडूचं वजन

पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूचे वजन ठराविक मर्यादेत असते. या चेंडूचे वजन साधारण 155.9 ग्रॅम ते 163 ग्रॅम दरम्यान ठेवलं जातं. यामुळे खेळात संतुलन आणि योग्य गती कायम राहते.

International Cricket Ball

औंसमध्ये मोजतात वजन

जर क्रिकेट बॉलचे वजन औंसमध्ये मोजले तर त्याचे प्रमाण वेगळे दिसते. पुरुष क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या चेंडूचे वजन 5.5 ते 5.75 औंस असते. हे मोजमाप आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्य केले गेले आहे.

T20 Cricket Ball

महिला क्रिकेट

महिला क्रिकेटमध्ये वापरला जाणारा चेंडू पुरुषांच्या तुलनेत थोडा हलका असतो. महिला क्रिकेट बॉलचे वजन साधारण 140 ग्रॅम ते 151 ग्रॅमपर्यंत ठेवले जाते. यामुळे खेळाडूंना चेंडू हाताळणे अधिक सोपे होते.

Red Cricket Ball

ज्युनियर क्रिकेट

ज्युनियर किंवा लहान मुलांच्या क्रिकेटमध्ये आणखी हलका चेंडू वापरला जातो. मुलांसाठीच्या क्रिकेट बॉलचे वजन साधारण 133 ग्रॅम ते 144 ग्रॅम असते. यामुळे मुलांना सुरक्षितपणे आणि सहज क्रिकेट खेळता येते.

Men’s Cricket Ball

टेस्ट क्रिकेट

टेस्ट क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या लाल चेंडूचं वजनही ठराविक नियमांनुसारच असतं. या लाल चेंडूचे वजन 155.9 ग्रॅम ते 163 ग्रॅम इतकंच ठेवलं जातं. टेस्ट क्रिकेटमध्ये बॉलची गुणवत्ता आणि संतुलन खूप महत्त्वाचं मानलं जातं.

Cricket Match Rules

वनडे आणि टी-20

वनडे आणि टी-20 सामन्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या पांढऱ्या आणि गुलाबी चेंडूचं वजनही समान असतं. आयसीसीच्या Law 4 नुसार क्रिकेट बॉलच्या वजनात किंवा आकारात छेडछाड करण्यास बंदी आहे.

Cricket Training

Weak heart signs: पायांमध्ये ही २ लक्षणं दिसली तर समजा तुमचं हृदय कमकुवत झालंय

Weak heart signs | saam tv
येथे क्लिक करा