Manasvi Choudhary
किडनी हा शरीराचा महत्वाचा अवयव आहे. शरीरातील रक्त शुद्ध करण्यापासून ते शरीरातील विषारी घटक बाहेर काढण्याचे कार्य किडनी करते.
मात्र सध्याच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे, खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींचा परिणाम किडनीवर देखील होतो.
किडनीच्या समस्या सुरू होण्यापूर्वी शरीर काही संकेत देते ज्याकडे आपण नकळत दुर्लक्ष करतो मात्र त्याचा परिणाम अधिक होऊ शकतो.
1) सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर सूज असेल तर दुर्लक्ष करू नका.
2) पायांना किंवा पायांच्या टाचांना सूज असेल तर वेळीच सावध होणे महत्वाचे आहे.
3) किडनी रक्तातील विषारी घटक बाहेर काढत नाही तेव्हा शरीरात अतिरिक्त द्रव साचून राहते यामुळे शरीराला सूज येते
4) लघवीत फेस किंवा बुडबुडे येणे हे देखील किडनी खराब होण्याचे सुरूवातीचे लक्षण आहे.
5) तोंडातून दुर्गंधी येणे हे देखील किडनीच्या समस्यांचे लक्षण असू शकते वेळीच लक्ष द्या.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. साम टिव्ही याचे पुष्टीकरण करत नाही.