घाटकोपर रेल्वे स्थानकालगतच्या बर्गर शॉपला भीषण आग
अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आणली आटोक्यात
कर्मचारी वेळीच बाहेर पडल्यानं जीवितहानी टळली
दोनच दिवसांपूर्वी घाटकोपर पूर्वेला इमारतीला लागली होती आग
मयूर राणे, साम प्रतिनिधी | मुंबई
fire at burger shop near Ghatkopar Railway Station: घाटकोपरमध्ये सात मजली इमारतीला लागलेल्या आगीच्या घटनेला दोन दिवस उलटत नाही तोच पुन्हा एकदा याच शहरात एका बर्गर शॉपला आग लागली. रेल्वे स्थानकाजवळच असलेल्या बर्गर शॉपला भीषण आग लागली. सुदैवानं दुकानातील कर्मचारी प्रसंगावधान राखून बाहेर पडल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घाटकोपर रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या श्रद्धानंद रोडवरील बर्गरच्या दुकानाला आज, बुधवारी भीषण आग लागली. बॉम्बे बर्गर नावाचं हे दुकान आहे. सुरुवातीला या दुकानातून धूर येऊ लागला. संपूर्ण दुकान धुरानं काळवंडलं होतं. काही वेळातच या ठिकाणी आगीचा भडका उडाला. सुदैवानं यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या बाजूलाच हे बर्गरचं दुकान आहे. या दुकानातून सुरुवातीला धूर येऊ लागला. काही वेळानं आगीच्या ज्वाळा बाहेर पडू लागल्या. या घटनेनं गोंधळ काही काळ निर्माण झाला होता. दुकानातील कर्मचारी वेळीच बाहेर पडले. त्यामुळं जीवितहानी टळली. आगीच्या घटनेनंतर स्थानिकांनी धावाधाव केली. अग्निशमन दलाचे कर्मचारी वेळीच घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सुदैवाने ही आग आजूबाजूच्या दुकानात पसरली नाही. या आगीत संपूर्ण दुकान खाक झाले आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.