Mumbai Fire News Saam Tv
मुंबई/पुणे

Mumbai Fire News : मुंबईच्या अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये भीषण आग; अग्निशमन दल घटनास्थळी

अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागल्याची घटना घडली आहे.

साम टिव्ही ब्युरो

संजय गडदे

Mumbai Fire News : मुंबईमध्ये मागील काही दिवसांपासून आगीच्या घटनांची मालिका सुरुच आहे. आज, मंगळवारी देखील अंधेरीत आगाची दुर्घटना घडली आहे. अंधेरीतील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटला आग लागल्याची घटना घडली. ही घटना मंगळवारी सांयकाळी ६:१५ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन घटनास्थळी दाखल झाले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत (Mumbai) मागील काही दिवसांपासून सातत्याने आगीच्या घटना घडत आहेत. आज, मंगळवारी सायंकाळी सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास मरोळ नाका भागातील मित्तल इंडस्ट्रियल इस्टेटला आगी लागली. इस्टेटच्या इमारत क्रमांक पाचच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागल्याची घटना घडल्याची माहिती पुढे आली आहे. अंधेरी कुर्ला रोडवरील मरोळ नाका परिसरात ही आग लागली आहे. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दोन गाड्यांमधून धुराचे लोळ मोठ्या प्रमाणावर हवेत पसरले आहे.

अंधेरीची ही आग लेव्हल दोनची असून मुंबई अग्निशमन दलाचे जवान सध्या आग विझविण्याचे प्रयत्न करत आहेत. आठ फायर इंजिन, एक क्यूआरव्ही, एक बीए van, चार जम्बो टँकर, चार वॉटर टँकर, चार स्टेशन ऑफिसर, एक एडीएफओ आणि एक डीएफओ सध्या घटनास्थळावर उपस्थित आहेत. या आगीत सुदैवाने कोणीही जखमी झाले नसल्याचे समजते. (Latest Mumbai News)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vanita Kharat मराठी सिनेसृष्टीतील टॉपची अभिनेत्री, पण नवरा काय करतो? तुम्हाला माहितीये का

Maharashtra News Live Updates: बच्चू कडू यांनी विशाल शक्ती प्रदर्शन करत काढली बाईक रॅली

Vinod Tawde: एक है तो सेफ है, राहुल गांधी फेक है, काँग्रेसच्या आरोपांवर विनोद तावडेंचं उत्तर

Beed Politics: प्रचारात रंगलीय डुक्कर मारण्याची चर्चा, आष्टीतील उमेदवारांचे एकमेकांना चॅलेंज

Nanded News : आगीत दोन घरांसह गोठा जळून खाक; ८ शेळ्यांचा मृत्यू, संसाराची राखरांगोळी

SCROLL FOR NEXT