Badlapur Kharwai MIDC Blast Saam TV
मुंबई/पुणे

Badlapur Breaking News: बदलापूर खरवई MIDC कंपनीत भीषण स्फोट; १० ते १२ किलोमीटरपर्यंत परिसर हादरला; भयानक VIDEO

Badlapur Kharwai MIDC Fire: बदलापूर शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात ४ ते ५ कामगार जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे.

Satish Daud

Badlapur Kharwai MIDC Blast

बदलापूर शहरातील खरवई एमआयडीसी परिसरातील एका कंपनीत गुरुवारी पहाटेच्या सुमारास भीषण स्फोट झाला. या स्फोटात ४ ते ५ कामगार जखमी झाल्याची प्राथामिक माहिती आहे. स्फोटामुळे कंपनीला मोठी आग लागली असून घटनास्थळी अग्निशमन दलाचे बंब दाखल झाले आहेत. सध्या आग विझवण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, खरवई एमआयडीसी (Badlapur News) परिसरात व्ही.के केमिकल कंपनी आहे. या कंपनीत काही कामगार काम करीत होते. गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास कंपनीत अचानक मोठा स्फोट झाला. या स्फोट इतका भीषण होता, की १० ते १२ किलोमीटपर्यंत हादरे जाणवले.

या घटनेत ४ ते ५ कामगार जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं बोललं जातंय. स्फोटामुळे आगीचा भडका उडवून कंपनीला मोठी आग लागली. (Latest Marathi News)

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अथक प्रयत्नानंतर आगी आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, आगीत कंपनीचं मोठं नुकसान झालं आहे.

कंपनीतील कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, व्ही.के केमिकल कंपनीच्या बाहेर दोन टेम्पो उभे होते. यावेळी या टेम्पो मधील केमिकल मध्ये प्रथम आग लागली. त्यानंतर ही आग कंपनीमध्ये पसरली. क्षणार्धात मोठा स्फोट होऊन १० ते १२ किलोमीटरपर्यंत हादरे जाणवले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Santosh Bangar : संतोष बांगर वादाच्या भोवऱ्यात; निवडणूक अधिकाऱ्यांकडून गुन्हा दाखल, आमदारांनी काय केलं?

भारतात लवकरच लाँच होणार धमाकेदार Realme आणि Redmi चे फोन , फीचर्स आहेत शानदार

मालवणमध्ये एकनाथ शिंदेंनी बॅगेतून काय आणलं? भाजपनंतर शिंदेंवर पैसे वाटपाचे आरोप, VIDEO

Politics : माजी मुख्यमंत्र्यांना मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकारणातून संन्यास

Maharashtra Nagar Parishad Live : बदलापूर नगरपालिका निवडणुकीत 58.30 % मतदान

SCROLL FOR NEXT