Pune Navle Bridge Accident  Saam TV
मुंबई/पुणे

Pune Accident News: पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात; भरधाव डंपरने खासगी बसला उडवलं, थरारक घटना

Navle Bridge Accident: शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला जोरदार धडक दिली.

Satish Daud

Pune Navle Bridge Accident 

पुण्यातीत अपघातांचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. शुक्रवारी पहाटे ६ वाजेच्या सुमारास पुण्यातील नवले पुलाजवळ पुन्हा एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात जाणाऱ्या डंपरने प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या खासगी बसला जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या घटनेत डंपरचालकासह ट्रॅव्हल्समधील ७ ते ८ जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर नवले पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. (Latest Crime News)

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय. घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलाजवळ (Navle Bridge) व्हीआरएल ट्रॅव्हल्स कंपनीचे ऑफिस आहे.

इथून शुक्रवारी सकाळी ६ वाजेच्या सुमारास प्रवाशांना घेऊन ट्रॅव्हल्स बाहेर पडत होती. त्यावेळी मुंबईच्या दिशेकडून भरधाव वेगाने आलेल्या डंपरने ट्रॅव्हल्सला पाठीमागून जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती, की दोन्ही वाहनांचा चक्काचूर झाला.

दरम्यान, पुण्यात अपघात होण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील भीष अपघाताच्या घटना घडल्या आहेत. अगदी आठवडाभरापूर्वी नवले पुलाजवळ विचित्र अपघात झाला होता. एका भरधाव ट्रॅंकरने ५ ते ६ वाहनांना धडक दिली होती. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाहनांचे मोठे नुकसान झाले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

National Highway Toll : प्रवाशांनो लक्ष द्या! राष्ट्रीय महामार्गांवरील टोल दर ५० टक्क्यांनी कमी; जाणून घ्या सरकारची अधिसूचना

Worli Dome : मोर्चाच्या चर्चेने सरकारला माघार घ्यावी लागली: Raj Thackeray | VIDEO

अनाजीपंत, अंतरपाट ते बाळासाहेब...; ठाकरे बंधू फडणवीसांवर तुटून पडले

Laptop Full Form: ९९% लोकांना माहित नसेल लॅपटॉपचे फुल फॉर्म काय?

Astro Tips: पुस्तकात मोरपंख नव्हे, 'ही' गोष्ट ठेवा आणि जीवनात जाणवा सकारात्मक बदल

SCROLL FOR NEXT