High Court Imposed 2 Crores Fine To Victim Saam Tv
मुंबई/पुणे

High Court News: विवाहित महिला लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही: हायकोर्ट

Gangappa Pujari

मुंबई, ता. २९ सप्टेंबर

High Court News: विवाहित महिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करु शकत नाही, असं महत्वाचे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवली आहे. पुण्यामधील बलात्कार प्रकरणातील आरोपीला अटकपूर्व जामीन मंजूर करताना एकल न्यायाधीश मनीष पितळे यांनी ही महत्वाची टिप्पणी केली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी अत्याचाराच्या एका प्रकरणात महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे. विवाहित स्त्री पुरुषाने लग्न करण्याच्या खोट्या आमिषाला बळी पडली, त्यामुळे लैंगिक संबंधास संमती दिली, असा दावा करु शकत नाही, असं कोर्टाने म्हटले आहे. पुणे पोलिसांनी बलात्कार प्रकरणातील एका आरोपीला अटक केली होती. त्याला जामीन मंजूर करताना कोर्टाने हे महत्वाचे निरीक्षण नोंदवले आहे.

पुण्यातील विशाल शिंदे या तरुणाने बलात्काराच्या गुन्ह्यात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. विशाल शिंदेविरोधात तक्रारदार महिला ही विवाहित होती. महिलेच्या तक्रारीनुसार, दोघांमध्ये मैत्री होती. याच मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. आरोपी विशाल शिंदेने महिलेला विवाहाचे आमिष दाखवून शरीरसंबंध प्रस्थापित केले, नंतर लग्न करण्यास नकार दिला. परंतु न्यायालयाने महिलेचे हे आरोप फेटाळून लावले आहेत.

तक्रारदार महिला विवाहित आहे, तसेच आरोपीही विवाहीत आहे. त्यामुळे आरोपीशी लग्न करु शकत नाही, याची कल्पना महिलेला होती. अशात लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार हा आरोप प्रथमदर्शनी चुकीचा आहे, असं न्यायमुर्ती मनिष पितळे यांनी म्हटलं आहे. तसेच महिलेने आरोपी वारंवार व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत असल्याचे म्हटले होते. मात्र आरोपीने कोणतेही व्हिडिओ व्हायरल केले नसल्याचेही समोर आले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bengali Bride : बंगाली ब्राइडचे सुंदर आणि आकर्षक लूक

WTC Points Table: श्रीलंकेच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! WTC फायनलमध्ये जाण्यासाठी 3 संघांमध्ये चढाओढ

Deepika Padukone: प्रेग्नंसीनंतर दीपिका पहिल्यांदाच माध्यमांच्या समोर, आरोग्याबाबत दिली माहिती...

Marathi News Live Updates : विजेचा शॉक लागून तीन जण ठार तर एक जण जखमी,मृतात 13 वर्षाच्या मुलाचा समावेश

Sambhajinagar Corporation : कर भरणाऱ्यांनाच आता मनपा देणार कंत्राट; महापालिका प्रशासकांचा निर्णय, सादर करावे लागेल एनओसी

SCROLL FOR NEXT