Borivali Police Station सूरज सावंत
मुंबई/पुणे

Mumbai Crime: लग्न ठरलं पण अल्पवयीन असल्यानं विवाहाला विलंब; मुलीनं घरातच घेतला गळफास

Mumbai Latest News: मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार हे लग्न मुला-मुलींच्या कुटुबियांसाठी अडचणीचं होतं. त्यामुळेच घरातल्यांनी मुलीला २ महिन्यांनी १८ वर्ष पूर्ण होत असून त्यानंतर लग्न करण्याचे ठरवले.

सूरज सावंत

Mumbai Crime News: मुंबईच्या बोरिलवलीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.लग्न ठरवून दोन महिने झाले तरीही घरातले विवाह लावून न देत नव्हेत या रागातून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आपल्या घरातच गळफास घेत स्वतःचं जीवन संपवलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत मुलगी ही बोरिवलीच्या एल टी रोड, भंडारी चाळ परिसरात राहते. तिचं दोन महिन्यांपूर्वीत लग्न ठरलं होतं. लग्न ठरलं त्यावेळी मुलीचं वय हे १७ वर्षे इतकं होतं. ही मुलगी अल्पवयीन असल्याने कायद्यानुसार हे लग्न मुला-मुलींच्या कुटुबियांसाठी अडचणीचं होतं. त्यामुळेच घरातल्यांनी मुलीला २ महिन्यांनी १८ वर्ष पूर्ण होत असून त्यानंतर लग्न करण्याचे ठरवले. (Borivali Crime News)

मात्र, याच रागातून मुलीने शुक्रवारी, २३ डिसेंबरला घरात कोणी नसताना किचनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी बोरिवली (Borivali) पोलिस ठाण्यात अपमृत्यूची नोंद केली असून मुलीच्या मृत्यूचे निश्चित कारण समजण्यासाठी मृतदेह शताब्दी या शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

कायदा काय सांगतो?

लग्न लागायच्या वेळी जर वधू किंवा वर यांच्यापैकी कुणाचेही वय कायद्याला मान्य असलेल्या वयापेक्षा कमी असेल तर त्यांचा विवाह बालविवाह ठरतो. भारतात वधूचे वय १८ आणि वराचे २१ पेक्षा कमी असू नये असे कायदा सांगतो. पुर्वी काही समाजात मूल जन्माला यायच्या आधीच त्याचे आपल्या नात्यात लग्न ठरवून टाकले जात, तशा शपथा जातीच्या पंचांसमोर घेतल्या जात असे अज ही काही प्रमाणात असे प्रकार होतानी आढळून येतात. (Latest Marathi News)

बालविवाह झालेल्या मुलींचा लैंगिक विकास पुरेसा झालेला नसतो. अशा स्थितीत १८ वर्ष गाठायच्या आतच त्यांना गर्भधारणा झाली तर बाळाच्या पोषणासाठी अजिबातच सक्षम नसलेले शरीर, घरातल्या कामाचे ओझे आणि त्यातच अपुरे पोषण.. या सा्ऱ्यांचे वाईट परिणाम त्या बाळाच्या आरोग्यावर झाल्याखेरीज राहात नाहीत.

लहान वयात लग्न झाल्यामुळे आपल्या लैंगिकतेविषयी पुरेसे ज्ञान या मुलींना नसते. कुटुंबनियोजन, गर्भधारणा आणि गर्भारपणात घ्यायची काळजी हे तर फारच दूरचे विषय असतात. त्यामुळे त्यांना कधीकधी आपले बाळ जगात येण्याआधी, कधी जन्मानंतर लगेच, तर कधी जन्मानंतर एक-दोन वर्षात गमवावे लागते. बालविवाह हा कायद्याने गुन्हा तर आहेच पण आजच्या काळात हे असे घडणे म्हणजेच नवीन विचार शक्तीला काळिमा आहे.

बालविवाहासाठी शिक्षेची तरतूद

- १८ वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या पुरुषाने बालवधूशी विवाह केल्यास त्या पुरुषाला दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाखपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

-जाणीवपूर्वक बालविवाह ठरविणाऱ्यास, त्यासाठीचा सोहळा पार पाडणाऱ्यास किंवा प्रोत्साहन देणाऱ्यास दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद आणि रु.एक लाख पर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.

- बालविवाह झाल्यास, संबंधित वर वा वधू यांचे आईवडील किंवा पालक, अन्य नातेवाईक मित्र परिवार असे सर्व, ज्यांनी हा विवाह घडविण्यास प्रत्यक्षात मदत केली किंवा तो न होण्यासाठी प्रयत्न केले नाहीत, वा जे अशा विवाहात सामील झाले होते अशा सर्वांना दोन वर्षापर्यंत सक्त मजुरीची कैद व एक लाख रुपयापर्यंत दंड होऊ शकतो. मात्र संबंधित स्त्री गुन्हेगारांना कैदेची शिक्षा होणार नाही.

Edited By - Akshay Baisane

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महाराष्ट्रात नवीन १२ कोरोना रुग्णांची नोंद, २४ तासांत एकाचा मृत्यू

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

SCROLL FOR NEXT