कल्याण डोंबिवलीत लवचिक भूमिका घेऊन मनसेनं शिंदेंना पाठिंबा दिला आणि सत्ता स्थापनेच्या आधीच राज ठाकरेंनी पालिका प्रशासनालाच मराठी माणसांसाठी अंगावर घेण्याचा इशारा दिला. डोंबिवलीतील एका मराठी तरुणीच्या व्यवसायाला विरोध करत अडचणीत आणल्याचा व्हिडीओ समोर आला.
डोबिंवली स्टेशन परिसरात सावंत शोरमा नावानं एकता सावंत या मराठी तरुणींन व्यवसाय सुरु केला. मेहनतीच्या जोरावर अल्पावधीत लोकांच्या पसंतीस उतरलेल्या तिच्या या शोरमाला मागणी वाढू लागली आणि तिच्या या व्यवसायावर स्थानिक परप्रांतिय व्यावसायिकांची आणि भ्रष्ट पालिका अधिकाऱ्यांच्या अभद्र युतीची वक्रदृष्टी पडली. आणि सुरु झाला पालिकेकडून छळ....
एका गाडीसाठी ४ जागा बदलूनही पालिकेचे अधिकारी स्टॉल हटवण्याची धमकी देत घाबरवत असल्यानं या तरुणीला रडू कोसळलं आणि तिचा हाच व्हिडीओ मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पाहिला. मराठी माणसांनं सत्तेवर जाण्यापासून राज ठाकरेंना रोखलं जरी असलं तरी राज ठाकरेंनी या मराठी तरुणीच्या मदतीच्या आर्त हाकेला साद देत जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधवांना तिच्या भेटीसाठी पाठवून तिला सर्वोतोपरी मदतीचं आश्वासन दिलं.
मराठी माणूस व्यवसाय करत नाही असा अपप्रचार करून त्याला व्यवसायापासून दूर ठेवलं जात असल्याचा या प्रकरणामुळे पुन्हा पर्दाफाश झालाय. आणि याच मराठी माणसाचे मारेकरी हे महापालिकेत बसलेले मराठी अधिकारी आहेत. त्यामुळे या भ्रष्ट अधिकाऱ्यांवर आणि माजुरड्या परप्रांतीयांवर कारवाईची गरज आहे. मात्र निवडणुकीपूर्वी मुंबई मराठी माणसाचीच राहणार अशी प्रचारात घोषणा देणारे आता मुंबई आणि एमएमआरमधल्या महापालिकांमध्ये सत्तेत आले आहेत. आता हे सत्ताधारी मराठी माणसाला न्याय देणार की पुन्हा ठाकरेंकडेच जावे लागणार याबाबत उत्सुकता आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.